प्रेक्षकांनो, तयार व्हा ‘मल्हार’ येतोय 31 मे रोजी भेटीला; हिंदी, मराठीमध्ये होणार प्रदर्शित

प्रेक्षकांनो, तयार व्हा  ‘मल्हार’ येतोय 31 मे रोजी भेटीला; हिंदी, मराठीमध्ये होणार प्रदर्शित

Malhar Movie :  व्ही मोशन पिक्चर्स (V Motion Pictures) प्रेक्षकांसाठी आणखी एका नवीन चित्रपट घेऊन येत आहे. व्ही मोशन पिक्चर्सने ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.  31 मे 2024 रोजी ‘मल्हार’  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.व्ही मोशन पिक्चर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.

‘मल्हार’चे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे या चित्रपटाची क्रेझ सध्या वाढत आहे. व्ही मोशन पिक्चर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची स्टोरी गुजरातमधील कच्छच्या ग्रामीण भागात घडत असून या चित्रपटामध्ये तीन वेगवेगळया स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या तिन्ही स्टोरीसचा  एकमेकांशी संबंध चित्रपटामध्ये दिसणार आहे.

मल्हार चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, हृषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, विनायक पोद्दार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि रवी झंकाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे आणि या चित्रपटाचे निर्माते प्रफुल पासड आहे.

या चित्रपटाबद्दल माहिती देताना दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणाले, मल्हार चित्रपट गावाकडील अनेक विषयांवर आधारित असून यात अनेक पात्रांचा समावेश आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी स्टोरी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

6 किलो सोने अन् मुंबई, मनालीमध्ये फ्लॅट, ‘पंगाक्वीन’ कंगनाकडे किती कोटींची मालमत्ता?

याच बरोबर  मैत्री, प्रेम,विश्वास अशी भावनात्मक जोड प्रेक्षकांना मल्हारमध्ये पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी हा एक नवा अनुभव असेल असं देखील दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणाले.  या चित्रपटाची एक वेगळी स्टोरी असल्याने या चित्रपटाला प्रेक्षक पसंती दर्शवतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज