Tendlya Trailer: क्रिकेटच्या आठवणी जागवणारा बहुप्रतीक्षित ‘तेंडल्या’ चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Tendlya Trailer: क्रिकेटच्या आठवणी जागवणारा बहुप्रतीक्षित ‘तेंडल्या’ चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Tendlya Trailer: ‘सचिन तेंडुलकर’ म्हटलं की डोळ्यासमोर येतं खचाखच भसलेलं स्टेडियम आणि ‘सचिन…सचिन…’चा जोरदार तो नारा. सामान्य कुटुंबात जन्माला आलेला सचिनने (Sachin Tendulkar) प्रत्येकाला स्वप्न पाहायला शिकवले आहे. (Tendlya Trailer) या गोष्टीने प्रेरित होऊन त्याच्या एका चाहत्याने देखील चित्रपट बनवण्याचे स्वप्न बघितले आहे.

क्रिकेटचे वेड काहीही केलं तरी कमी होत नाही. अश्वमेध मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘तेंडल्या’ (Tendlya ) या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘तेंडल्या’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातीलाच लहान मुलगा बॅट घेण्याचा हट्ट करत असल्याचे दिसत आहे. मला कंपास वैगरे काही नको, मला बॅट हवी, असे तो सांगताना आपल्याला बघायला भेटणार आहे.

त्यानंतर त्याची आई त्याला जोरदार धपाटे देते. यानंतर भारत- पाकिस्तान सामना बघण्यासाठी सुरु असलेला धावपळ, लहान मुलांची भारताच्या टीममध्ये जागा मिळवण्यासाठीची धडपड आणि घरात टिव्हीवर सामना बघता यावा यासाठीची धडपड या चित्रपटात चाहत्यांना दिसणार आहे. ‘तेंडल्या’ या चित्रपटाची कथा ही ग्रामीण भागातील राहणाऱ्या लोकांचे सचिन तेंडुलकरवर असणारं प्रेम आणि क्रिकेट यावर अवलंबून आहे.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

या चित्रपटाला ५ राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची निर्मिती कोरोनाच्या काळाअगोदर झाली होती. २४ एप्रिल २०२० रोजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडल गेल असल्याचे सांगण्यात आले आहे.

येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात झळकणारे कलाकार शूटिंगच्या वेळी ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण घेत होते. यात ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, आकाश तिकोटी हे कलाकार चाहत्यांना दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube