सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यास सुरूवात, 14 जणांना मिळालं नागरिकत्व; गृहमंत्रायलाची माहिती

सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यास सुरूवात, 14 जणांना मिळालं नागरिकत्व; गृहमंत्रायलाची माहिती

Citizenship Certificates: नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) लागू झाल्यानंतर प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व (Indian citizenship) देण्यात आलं आहे. या कायद्यानुसार नागरिकत् मिळवणारे ते पहिले लोक आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांनी नवी दिल्लीत या अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे दिली.

Ishq Vishq Rebound च्या टीझरची प्रतीक्षा संपली; रोहित सराफ पुन्हा प्रेक्षकांना आपलंसं करणार! 

मोदी सरकारने 11 मार्च रोजी सीएएची अधिसूचना जारी केली. त्यानंतर या 14 लोकांनी भारतीय नागरिकत्वासाठी पोर्टलवर अर्ज केला होता. दरम्यान, बुधवारी (दि. 15 मे) 14 जणांच्या त्यांच्या अर्जांवर ऑनलाइन प्रक्रिया केल्यानंतर नागरिकत्व प्रमाणपत्र मिळाले. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रे देऊन त्यांचे अभिनंदन केले

Ground Report : रावेरच्या सोप्या पेपरचेही भाजपला टेन्शन; श्रीराम पाटलांनी शेवटच्या टप्प्यात आणली रंगत 

नागरिकत्व सुधारणा कायदा 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेने मंजूर केला होता. यानंतर या कायद्याविरोधात देशभरात आंदोलन आणि निदर्शने झाली. यामुळेच सरकारला हा कायदा तातडीने लागू करता आला नाही. अखेर केंद्र सरकारने 11 मार्च 2024 रोजी नागरिकत्व (सुधारणा) नियम 2024 अधिसूचित केले. त्यानुसार 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने CAA अंतर्गत नागरिकत्व मिळविण्यासाठी एक पोर्टल तयार केले आहे. यासाठी निर्वासितांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. कोणाला भारतीय नागरिकत्व द्यायचं याचा अधिकार केंद्राला आहे.

नागरिकत्वासाठी अर्ज कसा करावा?
CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारतात येण्याची तारीख सांगावी लागेल. आवश्यक कागदपत्रे म्हणजे जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र, तीन शेजारील देशांपैकी कोणतेही एका देशाचं सरकारी प्रमाणपत्र आवश्यक असेल. याशिवाय, अर्जदाराला तो हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन किंवा जैन समुदायाचा असल्याची पुष्टी करणारे प्रमाणपत्र द्यावे लागेल. नागरिकत्वासाठी अट अशी आहे की अर्जदार 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आला असावा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज