गड्या, आपला विदेशच बरा! पाच वर्षांत ८ लाख भारतीय विदेशात सेटल; देश सोडण्याची कारणंही धक्कादायक…

गड्या, आपला विदेशच बरा! पाच वर्षांत ८ लाख भारतीय विदेशात सेटल; देश सोडण्याची कारणंही धक्कादायक…

Citizenship : प्रत्येक वर्षात भारतीय नागरिकता सोडणाऱ्या नागरिकांचा आकडा दोन लाख पार झाला आहे. मागील वर्षात २.१६ लाख भारतीयांनी (Indian Citizen) विदेशात सेटल होणे पसंत केलं. यासाठी त्यांनी आपल्या देशाची नागरिकता देखील सोडली. २०२२ मध्ये हा आकडा २.२५ लाख इतका होता. विदेश राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनीच ऑगस्ट महिन्यात ही माहिती संसदेत दिली होती. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सिंह यांनी मागील पाच वर्षांतील आकडेवारी सभागृहात मांडली होती. मागील पाच वर्षात ही देश सोडणाऱ्या भारतीयांची संख्या ८ लाख ३४ हजार इतकी झाली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात लोक नागरिकता सोडून दुसऱ्या देशात का स्थायिक होत आहेत याची कारणं शोधण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे का? असा दुसरा प्रश्न त्यांनी विचारला. चला तर मग जाणून घेऊ या की इतक्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिकता सोडून विदेशात का स्थायिक होत आहेत.

पाच वर्षात किती लोकांनी सोडला भारत

देश सोडून विदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांची संख्या आता दोन लाख पार झाली आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०१९ मध्ये हा आकडा १.४४ लाख इतका होता. कोरोना काळात (Covid 19) हा आकडा काहीसा कमी झाला होता. पण २०२१ पासून पुन्हा यामध्ये वाढ होऊ लागली. २०२१ मध्ये १.६३ लाख, २०२२ मध्ये २.२५ लाख लोकांनी भारत सोडला. सन २०२३ मध्ये हा आकडा २.१६ लाख होता.

चंद्रालाच लागलंय ‘चीन’चं ग्रहण; ‘हिलियम’ पृथ्वीवर आणण्याचा प्लॅन होतोय रेडी

इतक्या मोठ्या संख्येने भारतीय देश का सोडत आहेत? हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला जाबही विचारला आहे. यामागे काय कारण आहे याची माहिती समोर आली आहे. विदेशात स्थायिक होण्यासाठी भारतीय ज्या देशांना सर्वाधिक प्राधान्य देतात त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, यूएई, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. सर्वाधिक भारतीय याच देशांत स्थायिक होत आहेत.

भारतीयांची देश सोडण्याची पाच मुख्य कारणे

क्वालिटी ऑफ लाईफ

सुख सुविधा असल्या पाहिजेत या इच्छेमुळे भारतीय विदेशात स्थायिक होत आहेत. भारतीयांच्या मते विदेशात स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगली आहे. शिक्षणाच्या सुविधाही दर्जेदार आहेत. सुविधा जास्त आहेत आणि लाईफ सोपी आहे. मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होते. क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स २०२४ च्या आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारत थेट ५३ व्या क्रमांकावर आहे. भारतीय नागरिक ज्या देशांत स्थायिक होत आहेत ते देश या रँकिंग मध्ये टॉपवर आहेत.

रोजगाराच्या चांगल्या संधी

भारतीय ज्या देशांत स्थायिक होत आहेत त्या देशांमध्ये एक खास गोष्ट आहे ती म्हणजे रोजगाराच्या चांगल्या संधी. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला पहायला मिळतील की भारतीय नागरिक रोजगाराच्या उद्देशाने एखाद्या देशात गेले आणि चांगला पगार आणि विविध सुविधा मिळत असल्याने तेथेच स्थायिक झाले. हेच लोक असा दावा करतात की येथे काम करण्यासाठी चांगले वातावरण आहे. येथे कामाचे तास निश्चित आहेत. कामाच्या ठिकाणी नियम आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

करात सवलत, व्यापारी वातावरण

आर्थिक लाभ आणि व्यापारी वातावरण या कारणांमुळे सुद्धा भारतीय विदेशात स्थायिक होत आहेत. अनेक देश करांमध्ये भरघोस सवलती देतात. येथील कररचना भारतापेक्षा खूप वेगळी आहे. व्यापार व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. याच कारणांमुळे भारतीय लोक व्यापाराच्या उद्देशाने भारतापेक्षा विदेशाना जास्त प्राधान्य देतात.

अजबच! अंतराळातून मतदान करणार सुनीता विलियम्स; NASA चा खास प्लॅन

दुहेरी नागरिकत्वाचा भारतात अभाव

भारतात दुहेरी नागरिकत्वाची कोणतीच तरतूद नाही. यामुळे सुद्धा भारतीय नागरिक विदेशात स्थायिक होण्यामागे एक कारण आहे. जर भारताने दुहेरी नागरिकत्वाची तरतूद केली तर या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. भारतात साधा सरळ नियम आहे की जर तुम्हाला दुसऱ्या देशाची नागरिकता हवी असेल तर तुम्हाला भारताची नागरिकता सोडावी लागेल. भारतीय नागरिकता सोडून विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी तेथे एक ओसीआय कार्ड असते.

ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया. ओसीआय कार्डधारक भारतात आजीवन राहू शकतो. येथे काम करू शकतो, आर्थिक देवाणघेवाण करू शकतो. काही निर्बंधही आहेत. जसे की या कार्ड धारकांना भारतात मतदानाचा अधिकार नाही. सरकारी नोकरी करता येत नाही. निवडणूक लढवता येत नाही. शेत जमीन खरेदी करता येत नाही.

पासपोर्टची ताकद

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२४ च्या अहवालात भारतीय पासपोर्ट ८२ क्रमांकावर (Indian Passport) आहे. सन २०२३ च्या तुलनेत दोन अंक मागे आहे. भारतीय पासपोर्टच्या मदतीने ५८ देशांत व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. पण ज्या देशांत भारतीय मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत त्या देशांचा पासपोर्ट भारतापेक्षा जास्त मजबूत आहे. उदा. अमेरिकी पासपोर्टच्या मदतीने १८६ देशांत ब्रिटिश पासपोर्टच्या मदतीने १९० देशांत फ्रान्स १९२, संयुक्त अरब अमिराती १८५ आणि ऑस्ट्रेलियन पासपोर्टच्या मदतीने १८९ देशांत व्हिसा फ्री एन्ट्री मिळते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube