बापरे! फक्त शरीरावरच नाही तर मेंदूवरही परिणाम करतो ‘हा’ आजार; धक्कादायक अहवाल

Caner : कॅन्सर हा मानवी शरीरासाठी धोकादायक (Cancer) आजार आहे. या रोगाचे वेळीच निदान होणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे योग्य औषधोपचार सुरू करून आजार आटोक्यात आणता येतो. पण बऱ्याचदा या आजाराचे वेळीच निदान होत नाही. यामागे महत्वाचे कारण म्हणजे कॅन्सर शरीरात अगदी बेमालूमपणे वाढत असतो. त्यामुळे जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत रुग्णाला आजाराची माहिती होत नाही. ज्यावेळी आजाराची माहिती होते त्यावेळी मात्र अनेकांना धक्का बसतो.
आजाराच्या चौथ्या टप्प्यात सुद्धा उपचार शक्य आहेत तरीही लोक मात्र सुरुवातीच्या टप्प्यातच लढण्याची उमेद हरवून बसतात. आता एक आणखी धक्कादायक शोध समोर आला आहे. कॅन्सर फक्त शरीराच्या प्रभावित भागावरच कब्जा करत नाही तर मेंदूवरही (Brain) कब्जा करतो. सायन्स मॅगझिनमधील रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
कॅन्सर मेंदू आणि तंत्रिका तंत्राला कसा प्रभावित करतो याचे विवेचन या रिपोर्टमध्ये करण्यात आले आहे. या गोष्टीची माहिती घेण्यासाठी उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगातून अगदी धक्कादायक निष्कर्ष समोर आले. कॅन्सरचा टप्पा जसजसा पुढे सरकत असतो तसतसा हा आजार रुग्णाच्या मेंदूशी खेळू लागतो. हा आजार रुग्णाच्या इच्छा आणि प्रेरणा संपवण्याच्या दिशेने काम करतो. यामुळे रुग्ण उपचार आणि पोषण दिले जात असतानाही कमकुवत होत राहतो.
‘फक्त हसू नका…तर ढसा ढसा रडा’, हेल्दी राहण्यासाठी खूपच आवश्यक
मेंदू डिस्टर्ब करतो कॅन्सर
या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की कॅन्सर मेंदूतील एका विशिष्ट भागावर आपले नियंत्रण मिळवतो. तसेच तंत्रिका तंत्राला प्रभावित करतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उपकरणांचा या प्रयोगात उपयोग करण्यात आला होता. या उपकरणांच्या माध्यमातून संपूर्ण मेंदूचे चित्रीकरण करण्यात येते. तसेच मेंदूत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवता येते.
कॅन्सर वाढल्यानंतर उंदरांनी अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न कमी केले. जास्त परिश्रम असणारे कार्य करणे सुद्धा बंद केले. तंत्रिका तंत्राच्या माध्यमातून मेंदूंत तयार होणारे केमिकल डोपामाइनच्या पातळीला सुद्धा कमी केले. याच केमिकलमुळे व्यक्तीत इच्छाशक्ती उत्पन्न होते.
चौथ्या स्टेज मध्ये दिसतो प्रभाव
चौथ्या स्टेज मधील उपचारा दरम्यान रुग्ण अगदी उदासीन होतो. उपचार मात्र योग्य दिशेने सुरू असतात. या बरोबरच रुग्ण विरक्त होऊन जातो. या वृत्ती मेंदूशी संबंधित आहेत. म्हणजेच कॅन्सर फक्त शरीरावरच नाही तर मेंदूवरही प्रभाव टाकतो हे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
चेहऱ्यावर पिंपल आल्याने पठ्ठ्यानं थेट नोकरीलाच केला रामराम; नेटकऱ्यांना चर्चेसाठी मिळाला नवा विषय