सावधान! मुलांमध्येही वाढतोय मधुमेह; ‘या’ टिप्स फॉलो करा अन् आजाराला पळवा..

सावधान! मुलांमध्येही वाढतोय मधुमेह; ‘या’ टिप्स फॉलो करा अन् आजाराला पळवा..

Diabetes in Children : सध्याच्या काळात लहान मुलांमध्येही डायबिटीजची समस्या (Diabetes) निर्माण झाली आहे. आधी हा आजार फक्त मोठ्या माणसांत दिसून येत होता. परंतु आता लहान मुले सुद्धा या आजाराच्या विळख्यात सापडू लागली आहेत. जर पालकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले तर लहान मुलांना या आजारापासून नक्कीच वाचवता येईल.

भारतात मधुमेहाचा आजार वेगाने वाढत चालला आहे. लहान मुलांना आजाराने ग्रासले असून हा नक्कीच काळजीचा विषय आहे. अगदी लहान वयातच त्यांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. कमी वयात डायबिटीस होणे म्हणजे शरीरात अन्य आजारांचाही शिरकाव होणे. या आजारामुळे लठ्ठपणा, किडनीच्या समस्या, लिव्हर संबंधी समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत पालकांना मधुमेहासंदर्भात आवश्यक माहिती असली पाहिजे. डायबिटीसची लक्षणे आणि कारणे माहित झाल्यास पालक मुलांना या आजारापासून नक्कीच वाचवू शकतात.

जंक फूड अन् गोड खाण्याची सवय

घरातील अन्न सोडून मुलांना बाहेरच्या फास्ट फूडची सवय लागली आहे. जंक फूड आणि पॅकेट स्नॅक्स खाणे मुलांच्या आवडीचे आहे. पिझ्झा, बर्गर, चिप्स, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक, पॅकेट ज्यूसमध्ये जास्त प्रमाणात साखर आणि अनहेल्दी फॅट असते. यामुळे हळूहळू शरीरातील इन्सुलिन कमकुवत होते. यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) वाढत जाते. डायबेटिसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

पर्सनल अन् कॉर्पोरेट इन्शुरन्समध्येही फरक; फायद्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवाच!

मैदानी खेळांचा अभाव

आधीच्या दिवसांत मुले जास्तीत जास्त वेळ बाहेर खेळण्यात घालवत असत. परंतु आता मोबाईल, टिव्ही आणि व्हिडिओ गेममध्ये मुले इतकी हरवून गेली आहेत की बाहेर खेळणेच विसरली आहेत. यामुळे मुलांची फिजिकल अॅक्टिव्हिटी अतिशय कमी झाली आहे. ज्यावेळी शरीर योग्य पद्धतीने कार्यान्वित राहत नाही तेव्हा शरीरात अनावश्यक फॅट (चरबी) जमा होऊ लागते. यामुळे शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. अशा परिस्थितीत मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

लठ्ठपणा

जर मुलांचे वजन जास्त आहे तर त्याला मधुमेह होण्याचा धोकाही जास्त आहे. ज्यावेळी शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त चरबी जमा होऊ लागते तेव्हा इन्सुलिन व्यवस्थितपणे काम करत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. विशेष करून पोटाच्या आसपास चरबी जमा होऊ लागल्याने हा धोका आणखी वाढत जातो.

कुटुंबात मधुमेहाचा इतिहास

जर कुटुंबात कुणाला डायबिटीसची समस्या असेल तर मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. असे असले तरी प्रत्येकच मुलाला डायबिटीस होईल असेही नाही. पण जर खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईल चांगली नसेल तर मधुमेह लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांच्या घरात मधुमेहाचे रुग्ण आहेत त्या घरातील मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

ताणतणाव आणि अपुरी झोप

मुलांवर अभ्यासाचे दडपण, वाढलेला स्क्रीन टाइममुळे झोप व्यवस्थित होत नाही. तसेच तणावातही भर पडते. यामुळे सुद्धा डायबिटीसचा धोका वाढण्याची शक्यता असते. ज्यावेळी शरीराला आराम मिळत नाही किंवा मेंदू जास्त टेन्शन मध्ये असतो त्यावेळी हार्मोनल बॅलन्स बिघडतो. अशा परिस्थितीत मेटाबोलजम वर परिणाम होतो आणि डायबिटीसचा धोका वाढतो.

‘या’ 5 कारणांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! ‘अशी’ घ्या काळजी…

या टिप्स फॉलो कराच

मुलांना घरातील पौष्टिक आहार द्या.
बाहेरील जंक फूडचे प्रमाण अतिशय कमी करा. नाही दिले तर उत्तम.
दिवसातून कमीत कमी एक ते दोन तास मुलांना आऊटडोअर गेम्स किंवा काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी प्रोत्साहित करा.
गोड खाद्य पदार्थ आणि कोल्ड ड्रिंकची सवय हळूहळू कमी करा.
मुलांची झोप व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्या तसेच स्क्रीन टाइम कमी करा.
जर कुटुंबात कुणाला डायबिटीस असेल तर वेळोवेळी त्यांची तपासणी करत रहा.
सुरुवाती पासूनच मुलांना चांगल्या सवयी लावल्या तर मधुमेहा सारख्या आजारांपासून त्यांचा बचाव करता येणे सहज शक्य आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube