Video : जैन मुनींची भेटीनंतर मोठा राडा; खासदार मुरलीधर मोहळांनी सांगितली A टू Z स्टोरी
जैनमुनी यांचा जो काही जागेचा मुद्दा आहे तो बाजूला राहून माझ्यावर फार वाईट पद्धतीने आरोप झाले. परंतु, माझं कधीही नाव घेतलं नाही.
पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Mohal) यांच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्याकडून वारंवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. अशातच आज खासदार मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच जैन बोर्डिंग या ठिकाणी गेले होते. त्यानंतर लेट्सअप मराठीशी त्यांनी संवाद साधला आहे.
काय म्हणाले मोहळ?
जैनमुनी यांचा जो काही जागेचा मुद्दा आहे तो बाजूला राहून माझ्यावर फार वाईट पद्धतीने आरोप झाले. परंतु, जैनमुनी किंवा त्यांच्या संबंधित लोकांनी माझं कधीही नाव घेतलं नाही. बाकी लोकांनी मात्र, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे राजकारण करत आहेत. परंतु, जैनमुनींनी मला बोलावलं होत त्यामुळे मी गेलो. त्यांनी माझ्याकडून त्यांना सहकार्य व्हाव ही अपेक्षा व्यक्त केली. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांना मी सहकार्य करेल असं आश्वासन दिलं आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे. ते लेट्सअप मराठीशी बोलत होते.
Video : आरोपांच्या फैरी थांबेनात, अखेर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली जैन मुनींची भेट, काय झाली चर्चा?
मी जैनमुनींना भेटून बाहेर आल्यानंतर काही लोकांनी घोषणाबाजी केली हे खर आहे. परंतु, हे लोक त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी तेथे आले होते. त्यांना जैनमुनी यांच्या प्रश्नांशी काही देणघेण नाही असंही मोहळ यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर, आपलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अनेकवेळा बोलण झालं आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही हे प्रकरण नक्की सोडवू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे. त्यामुळे जैनमुनी यांना आश्वासन दिल्याप्रमाणे येणाऱ्या काळात या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढला जाईल असंही मोहळ म्हणाले आहेत.
काय घडलं होत?
मोहोळ माध्यमांशी बोलत असताना मात्र मागे जैन समाजाचे बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मोहोळ माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांना मध्येच अडवून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा, अशी मागणी केली. जमीन व्यवहार रद्द करण्याची घोषणा करावी. जमीन खरेदीचा व्यवहार हादेखील मोहोळ यांनीच केला आहे, असा आरोप यावेळी जैन समाजाने केला. पुढे जैन समाजाने आक्रमक होत घोषणाबाजी केली. बोर्डिंग डिल रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या. हा सर्व गोंधळ उडाल्यानंतर शेवटी मोहोळ यांनी तेथून काढता पाय घेतला.
