Video : आरोपांच्या फैरी थांबेनात…, अखेर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली जैन मुनींची भेट, काय झाली चर्चा?
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद वाढतच असल्याचं चित्र आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीबद्दल गेली अनेक दिवसांपासून पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर होत आहेत. अखेर, मोहळ आज जैन बोर्डिंगमध्ये जैन मुनींना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. (Mohal) शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्याकडून वारंवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. अशा वातावरणातच मोहळ यांनी जैनमुनींची भेट घेतली आहे, त्यामुळे हे प्रकरण आता तापलं आहे.
या भेटीनंतर मोहळ माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी या प्रकरणात सहभागी आहे, किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे असे आरोप केले जात आहेत. परंतु माझा यामध्ये सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. प्रत्येक समाजाचे गुरू असतात ते सर्वांसाठी वंदनीय असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. मी जर दोषी असतो तर मी इथे आलोच नसतो असं ते म्हणाले.
मोहोळ खोटारडे, जमीन चोरांची प्रकरणं घेऊन लवकरच भेटुया; धंगेकरांचा मोहोळांना इशारा
त्याचबरोबर या सर्व विषयावर राजकारण झाले आहे, व्यक्तीगत राजकारणातून या गोष्टी घडत गेल्या, मी आपल्याला आश्वासित करतो की या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांत हा प्रश्न संपेल आपल्या हवा तसा हा विषय संपेल. प्रेमाला प्रेमाची साध दिली जाते, लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून मला तुम्ही निवडून दिलं आहे. हा विषय संपवण्यासाठी तशी भूमिका घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असं यावेळी मोहोळ यांनी म्हटलं आहे.
जैन मुनी काय म्हणाले?
जोपर्यंत तुम्ही हा विषय संपवत नाहीत, तोपर्यंत आम्ही समाधानी नाहीत. मिडियाला आमचा आर्शीवाद आहे, त्यांनी हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवला, असं जैन मुनी यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, तुम्ही ज्या सुचना देत आहात त्या लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करेल, त्यासाठीच मी इथे आलो आहे.
