अहिल्यानगर शहरात विमानतळ होणार? मुरलीधर मोहळांनी स्पष्टच सांगितलं…

अहिल्यानगर शहरात विमानतळ होणार? मुरलीधर मोहळांनी स्पष्टच सांगितलं…

Muralidhar Mohal Statement On Airport In Ahilyanagar city : अहिल्यानगर शहरात विमानतळ व्हावं, अशी मागणी नागरिकांकडून केली (Airport In  Ahilyanagar ) जातेय. यावर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी (Muralidhar Mohal) स्पष्ट वक्तव्य केलंय. आमच्या सर्व आमदारांनी आणि इथल्या नागरिकांनी ती मागणी केलीय. देशात कुठेही विमानतळ करायचं असेल, तर त्याची जागा जी लागते, ती जागा राज्यसरकार देत असते.

‘आकां’चे आका मुंडे, अन् ‘सरताज’ देवेंद्र फडणवीस, अंधारेंनी नवीन शोध लावला…

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, देशात कुठेही तुम्ही विमानतळ करा. एकदा भूसंपादन करून आम्हाला दिल्यानंतर पुढचं काम आमचं असतं. केंद्र सरकारचं असतं. त्यामुळे आमदार संग्रामभैय्या यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांना मी विनंती केली (Ahilyanagar News) की, शेवटी राज्यसरकारचे प्रतिनिधी आपण सगळे आहात. त्यामुळे या भागात नवीन विमानतळाचा जो विचार आहे, त्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून आपण एखादी जागा ताब्यात घेतली पाहिजे. त्याचं भूसंपादन राज्य सरकार करतं. मग आमच्या माध्यमातून याठिकाणी त्या विमानतळाचं निर्माण होतं, असं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

शिर्डीतील नाईटलॅंडिंगचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तो शिर्डीच्या नाईटलॅंडिंगचा प्रश्न आता सुटलाय. त्याठिकाणी सियासेफची मॅनपावर लागत होती. 80C ची मॅनपावर लागत होती. हे दोन्ही प्रश्न सुटलेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली. त्यानंतर दोन दिवसातच 45 लोकं पाहिजे होती, तिथे 55 लोकं शिर्डी विमानतळावर आता भरती झाली आहेत. रनवेचं रिकार्पेटिंग सुरू आहे. हाच आता प्रश्न होता. दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल. माझ्या माहितीनुसार मार्च अखेरपर्यंत शिर्डी विमानतळाचं नाईटलॅंडिंग सुरू होईल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना दिली आहे.

जिथं अनेक काम बाकी तिथं मला संधी मिळाली त्यामुळे… पंकजा मुंडेंचं मंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण

नवी मुंबई विमानतळावर मार्च अखेरपर्यंत देशांतर्गत विमानसेवा सुरू होत आहे. एप्रिल अखेर आंतरराष्ट्रिय स्वरूपाची विमानसेवा सुरू होत असल्याचं देखील मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. अहिल्यानगरमध्ये बलभीमअण्णा जगताप क्रीडा नागरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन पार पडलं. हे मातीपूजन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालंय. यावेळी मोहोळ यांनी कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावं, असं आवाहन केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube