जिथं अनेक काम बाकी तिथं मला संधी मिळाली त्यामुळे… पंकजा मुंडेंचं मंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण

  • Written By: Published:
जिथं अनेक काम बाकी तिथं मला संधी मिळाली त्यामुळे… पंकजा मुंडेंचं मंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण

Environment Minister Pankaja Munde : आपली दृष्टी बदलली तर आपल्याला अनेक नव्या गोष्टी पाहण्याची संधी मिळते. ती संधी मला पर्यावरण खात्यामध्ये मिळाली आहे. तशा अनेक पातळ्यांवर मी काम करण्याचा विचार करत आहे. (Pankaja Munde) तसंच, सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा विषय असल्याने त्यामध्ये पूर्ण लक्ष देणार आहे असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या पिंपरी चिंचवडमध्ये आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या.

बीड प्रकरणावर धसांचं नाव घेत पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या म्हणाल्या, त्यांच्यामुळे

ज्या ठिकाणी सगळे काम झालेले आहेत त्यावेळी काही काम करता येत नाहीत. मला मिळालेलं खात बरेच काम बाकी असलेलं आहे. त्यामुळे काम करण्यासाठी मोठा वार आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, पुढच्या काळात मी चांगल्यात चांगला काम कस करता येईल यासाठी एक मंत्री म्हणून मी नक्की प्रयत्न करेन असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

पर्यावरण या क्षेत्रात केंद्र सरकारही मोठ काम करू पाहत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात पर्यावरण क्षेत्रात मोठ काम उभ करण्याचं माझ ध्येय आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. कारण आज देशातचं नाही तर जगातही पर्यावरणासंबंधी अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे त्यावर काम करणं गरजेच आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्याचबरोबर तरुणांना उद्योग व्यावसाय  ग्रामीण भागातच करता यावा यासाठीही पर्यावरण खात काम करणार आहे. कारण अनेक प्रयोग करता येतील असं हे खात आहे. त्यामुळे यातून जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल हे पाहण महत्वाचं आहे. तसंच, तो तरुणांच्या दृष्टीने आपल्या आसपास कसा उपलब्ध होईल हेही पाहाव लागेल असही त्या म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube