आश्चर्यच! श्रीमंत देशही कर्जबाजारी, जपान अव्वल तर अमेरिकेवरही भरमसाठ कर्ज
Most indebted Countries : वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सने आंतरराष्ट्रीय (World of Staistics) नाणेनिधी संघटनेच्या (IMF) अहवालाच्या आधारावर जगातील सर्वाधिक कर्जदार देशांची यादी जाहीर केली आहे. ही यादी त्या देशांवर त्यांच्या जीडीपीच्या किती (GDP) कर्ज आहे याचा विचार करून रँकिंग वर्ष २०२२ च्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या यादीत जगात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा भारत देश सुद्धा आहे. कर्जदार देशांची यादी पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कारण कर्जबाजारी देश म्हणून तुमच्या डोळ्यांपुढे ज्या देशांची नावं येतात त्याऐवजी श्रीमंत देशांची नावं आहेत.
कर्जबाजारी देशांच्या यादीत सर्वात आधी जपान (Japan) देश येतो. जपानवर त्याच्या एकूण जीडीपीच्या २१६ टक्के कर्ज आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ग्रीस देश आहे. ग्रीसवर त्याच्या जीडीपीच्या २०३ टक्के कर्ज आहे. देशाच्या एकूण जीडीपीच्या दुप्पट कर्ज ग्रीसवर आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांमध्ये गणना होणाऱ्या युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन (Britain) देशही कर्जाच्या सापळ्यात अडकला आहे. कर्जदार देशांच्या यादीत ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशावर त्याच्या जीडीपीच्या 142 टक्के कर्ज आहे.
भारताला खुपणाऱ्या प्रोजेक्टमध्ये इटलीची एन्ट्री? मेलोनींच्या चीन दौऱ्यात काय घडलं..
चौथ्या क्रमांकावर लेबनॉन आहे. लेबनॉनवर त्याच्या जीडीपीच्या 128 टक्के कर्ज आहे. सध्या हा देश युद्धाच्या संकटाला तोंड देत आहे. युरोपातील देश आर्थिक संपन्न म्हणून ओळखले जातात. निदान आपल्यापर्यंत तरी अशीच माहिती आली आहे. पण अहवाल मात्र वेगळीच माहिती देतात. कर्जदार देशांच्या यादीत युरोपातील आणखी एका देशाची भर पडली आहे. हा देश आहे स्पेन. स्पेनवर (Spain) आजमितीस त्याच्या जीडीपीच्या 111 टक्के कर्ज आहे. कोरोना संकट आणि त्यानंतर सुरू झालेल्या युक्रेन रशिया युद्धाचा (Ukraine Russia War) फटका स्पेनलाही बसला आहे.
जागतिक महासत्ता म्हणून ओळखला जाणारा अमेरिका सुद्धा कर्जदार (USA) देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि कर्जबाजारी. ऐकायला थोडं आश्चर्यच वाटेल पण खरं आहे. अमेरिकेवर त्याच्या जीडीपीच्या 110 टक्के कर्ज आहे. यानंतर भारताचा विचार (INDIA) केला तर आजमितीस भारतावर त्याच्या जीडीपीच्या 46 टक्के इतके कर्ज आहे. भारत सध्या जगात सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे. असे असतानाही जगातील श्रीमंत देशांच्या तुलनेत भारतावर कमी कर्ज असल्याचे दिसून येते.
तब्बल 20 वर्षांनंतर जपानने बदलल्या नोटा; ‘त्या’ घटना रोखण्यासाठी वापरलं खास टेक्निक