इस्त्रायलचा गाझात भीषण हल्ला; तब्बल 29 लोकांचा मृत्यू, लेबनॉननेही इस्त्रायलवर रॉकेट डागले

इस्त्रायलचा गाझात भीषण हल्ला; तब्बल 29 लोकांचा मृत्यू, लेबनॉननेही इस्त्रायलवर रॉकेट डागले

Israel Hamas War Updates : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध पुन्हा एकदा चिघळू (Israel Hamas War) लागले आहे. दुसरीकडे इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. इराण केव्हाही इस्त्रायलवर हल्ला (Israel Attack) करील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेबनॉनने तर उत्तर इस्त्रायल भागात रॉकेटद्वारे हल्ला केल्याची बातमीही आली आहे. या घडामोडींतच इस्त्रायलने पुन्हा (Gaza City) गाझा शहरात भीषण हल्ला केला आहे. इमारतीवरील हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत अशी माहिती पॅलेस्टिनी न्यूज अँड इन्फॉर्मेशन एजन्सीने दिली आहे.

Israel Airstrike in Syria : इस्त्राईलचा सिरीयात हवाईहल्ला; 36 जवान मारले, भयावह व्हिडीओ समोर

सिन्हुआ न्यूजच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. इस्त्रायलच्या संरक्षण दलाने एका निवेदनात म्हटले आहे की एअरफोर्सने मागील 24 तासांत गाझा शहरातील 60 पेक्षा आधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे येथील परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. हमासचा पूर्ण बिमोड हेच उद्दीष्ट इस्त्रायलसमोर आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असे इस्त्रायलने ठरवले आहे.

इराण हल्ल्याच्या तयारीत

दुसरीकडे इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. इस्त्रायलने इराणच्या हद्दीत केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची योजना इराणकडून आखली जात आहे. त्यामुळे इराण इस्त्रायलवर केव्हाही हल्ला करू शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत सरकारनेही अॅडव्हायजरी जारी करत या दोन्ही देेशांत प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. इराणने जर इस्त्रायलवर हल्ला केला तर इस्त्रायलचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

लेबनॉनचा इस्त्रायलवर रॉकेट हल्ला

लेबनॉनने उत्तर इस्त्रायलवर रॉकेट हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. इस्त्रायल डिफेन्स फोर्सने या हल्ल्याची माहिती दिली आहे. रॉकेट हल्ल्याच्या काही वेळ आधी उत्तर इस्त्रायलमध्ये अलर्ट सायरन वाजले होते. लेबनॉनच्या क्षेत्रातून येणाऱ्या 40 रॉकेट्सला हवेतच नष्ट करण्यात आल्याचे इस्त्रायल डिफेन्स फोर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात जीवितहानी किंवा अन्य काही नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Israel Hamas War : गाझावर व्यक्त व्हायला शब्द नाहीत; डब्लूएचओच्या प्रमुखांकडून इस्त्रालयची कानउघडणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube