Israel Hamas War : गाझातील लोकांची हेळसांड थांबवा; कमला हॅरिस यांची युद्धविरामाची मागणी

Israel Hamas War : गाझातील लोकांची हेळसांड थांबवा; कमला हॅरिस यांची युद्धविरामाची मागणी

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ( Israel Attack ) अजूनही सुरुच आहे. हमास ( Israel Hamas War ) या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल मैदानात उतरला आहे. मात्र दुसरीकडे गाझामधील लोक भुकेने तहानेने मरत आहेत. ही सर्व परिस्थिती मानवतेच्या विरुद्ध असल्याने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा. अशी मागणी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी केली आहे.

नवनीत राणांना केवळ आमंत्रण पण, त्यांचा पक्षप्रवेश नाही; चर्चांना बावनकुळेंचा फुलस्टॉप

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांनी गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचा आवाहन केलं. त्या म्हणाल्या की, गाझामधील लोक भुकेने आणि तहाने मरत आहेत. तेथील परिस्थिती अतिशय भयावह आणि मानवतेच्या विरुद्ध आहे. तसेच त्यांनी यावेळी इस्त्रायल गाझामधील मानवतावादी विध्वंस कमी करण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यास सांगितलं आहे. तर या परिस्थितीसाठी त्यांनी इस्त्रायलला जबाबदार धरले. तसेच त्यांनी इस्त्रायलला आपल्या सीमा उघडल्या जाव्यात आणि मदतीवर कोणतेही निर्बंध लादले जाऊ नयेत असं ही सांगितलं आहे.

Manoj Jarange Patil: ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज

नुकताच रविवारी युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी समोर आली. गाझातील हमास (Gaza City) नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्त्रायलने राफा शहरातील रुग्णालयाजवळ असलेल्या निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ला (Israel Attack) केला. या हल्ल्यात 11 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या छावण्यांत गाझातील निर्वासित नागरिक राहत होते. या हल्ल्यावर इस्त्रायली सैन्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. हा हल्ला अचूक होता जो दहशतवाद्यांना लक्ष्य करून करण्यात आला होता, असे सैन्याने स्पष्ट केले आहे.

इस्त्रायली लष्करानेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या परिसरातील रुग्णालयाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या युद्धात इस्त्रायली सैन्याने अनेक वेळा गाझातील रुग्णालयांभोवती हल्ले केले आहेत. हमासचे दहशतवादी त्यांच्या कारवायांसाठी रुग्णालयांचा वापर करतात असा इस्त्रायलचा आरोप आहे. मात्र हमासने हा आरोप नाकारला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज