Israel Attack : दहशतवादी समजून निर्वासितांच्या छावण्यांवर इस्त्रायलचा स्ट्राईक; 11 ठार

Israel Attack : दहशतवादी समजून निर्वासितांच्या छावण्यांवर इस्त्रायलचा स्ट्राईक; 11 ठार

Israeli Strike Hits Refugee Tents In Gaza : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel Attack) अजूनही सुरुच आहे. हमास (Israel Hamas War) या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल मैदानात उतरला आहे. आताही या युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी समोर आली आहे. गाझातील हमास (Gaza City) नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्त्रायलने राफा शहरातील रुग्णालयाजवळ असलेल्या निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ला (Israel Attack) केला. या हल्ल्यात 11 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या छावण्यांत गाझातील निर्वासित नागरिक राहत होते. या हल्ल्यावर इस्त्रायली सैन्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. हा हल्ला अचूक होता जो दहशतवाद्यांना लक्ष्य करून करण्यात आला होता, असे सैन्याने स्पष्ट केले आहे.

राफा शहरातील एमिराती मॅटर्निटी हॉस्पिटलजवळ हा हल्ला झाला. आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले की इस्त्रायली लष्कराच्या हल्ल्यात 11 नागरिक ठार झाले. तर 50 जण जखमी झाले. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना कुवेतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Israel Hamas War : मदतीच्या प्रतिक्षेतील पॅलेस्टिनींवर इस्त्रायलचा हल्ला; 50 लोकांचा मृत्यू

इस्त्रायली लष्करानेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या परिसरातील रुग्णालयाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या युद्धात इस्त्रायली सैन्याने अनेक वेळा गाझातील रुग्णालयांभोवती हल्ले केले आहेत. हमासचे दहशतवादी त्यांच्या कारवायांसाठी रुग्णालयांचा वापर करतात असा इस्त्रायलचा आरोप आहे. मात्र हमासने हा आरोप नाकारला आहे.

या हल्ल्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनीही भाष्य केले. ज्यांनी आपली घरे गमावली त्यांना आश्रय देण्यासाठी बांधलेल्या शिबिरांवर हा हल्ला अत्यंत क्रूर आहे. मयतांमध्ये दोन आरोग्य कर्मचारी आणि लहान मुलांचाही समावेश आहे. आरोग्य कर्मचारी आणि नागरिक हे लक्ष्य ठरू शकत नाहीत. त्यांचे नेहमीच संरक्षण केले पाहिजे, असे घेब्रेयेसस म्हणाले..

Israel Hamas War : गाझात इस्त्रायलचे हवाई हल्ले; 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

दरम्यान, याआधीही इस्त्रायलने गाझा शहरात मदतीच्या (Gaza City) प्रतिक्षेत उभ्या असलेल्या पॅलेस्टिनींवर हल्ला (Palestine) केला होता. या हल्ल्यात 50 लोकांचा मृत्यू झाला तर 250 जण जखमी झाले होते, अशी माहिती शिफा रुग्णालयाच्या नर्सिंग विभागाचे प्रमुख डॉ. शफाई यांनी दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube