Israel Hamas War : गाझात इस्त्रायलचे हवाई हल्ले; 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : गाझात इस्त्रायलचे हवाई हल्ले; 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

Israel Hamas war : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरूच आहे. हमास या दहशतवाद्यांच्या संघटनेचा समूळ नायनाट करण्याच्या उद्देशाने इस्त्रायल घातक हल्ले करत आहे. हमासने नुकताच दिलेला युद्धविरामाचा प्रस्तावही इस्त्रायलने नाकारला आहे. यानंतर गाझा पट्टीत (Gaza City) तुफान बॉम्बफेक करण्यात आली. या हवाई हल्ल्यात 50 ते 100 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हमासने ओलीस (Hamas) ठेवलेल्या इस्त्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी हल्ले केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्त्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. इस्त्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी छापेमारीनंतर या भागात हवाई हल्ले केले. येथे दोन ओलीस व्यक्तींना हमासच्या तावडीतून सोडवण्यात आले.

Israel Hamas War : युद्धविरामानंतर इस्त्रायलचा हमासवर एअरस्ट्राईक; तब्बल 90 लोकांचा मृत्यू

7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोकांचा बळी (Israel Palestine Conlflict) गेला आहे. या युद्धाचे चटके जगालाही बसू लागले होते. त्यामुळे अन्य देशांच्या मध्यस्थीनंतर 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशी हमासने इस्त्रायलच्या 16 ओलिसांची सुटका केली होती. मात्र हमासने अद्याप सगळ्या बंधकांची सुटका केलेली नाही असा आरोप इस्त्रायलने केला होता. तसेच गाझा पट्टीत कुणीही निर्दोष नाही असे इस्त्रायलने (Israel Attack) ठासून सांगितले होते. यानंतर आणखी काही वेळा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती.  मात्र युद्धविराम संपताच बॉम्बफेक सुरू होत होती. आताही इस्त्रायलने पुन्हा हमासवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.

आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा,  कॉलेज, निवासी इमारती, रुग्णालयांचे प्रचंड नुकासान झाले आहे. तसेच दोन्ही बाजूच्या हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. आताही येथील परिस्थितीच चिघळलेलीच आहे. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत मात्र अद्याप यश मिळालेले नाही.
या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. पाच महिने होत आले तरीही युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्धामुळे परिसराचीही मोठी हानी झाली आहे. या गोष्टींचा विचार मात्र दोन्ही बाजूंनी होत नाही. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज