Israel Attack : इस्त्रायलचा गाझा विद्यापीठावर मोठा हल्ला; इमारत उद्धवस्त, अमेरिकेचाही संताप

Israel Attack : इस्त्रायलचा गाझा विद्यापीठावर मोठा हल्ला; इमारत उद्धवस्त, अमेरिकेचाही संताप

Israel Attack on Gaza University : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला तीन महिन्यांचा काळ (Israel Hamas War) उलटला तरी युद्ध मिटलेले नाही. अजूनही काहीच मार्ग निघालेला नाही. हमासचा बिमोड करण्याच्या उद्देशाने इस्त्रायलने (Israel Attack) हल्ले सुरूच ठेवले आहेत. आताही युद्धाच्या मैदानातून अशीच एक मोठी बातमी आली आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईनमधील गाझा (Israel Palestine Conflict) विद्यापीठाला लक्ष्य केले आहे. इस्त्रायली सैन्याने या विद्यापीठावर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेनेही संतप्त प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्याचे स्पष्टीकरण इस्त्रायलकडून मागितले आहे.

Israel Hamas War : युद्धविराम संपताच इस्त्रायलचा ‘एअरस्ट्राइक’ बॉम्बफेकीत 178 लोकांचा मृत्यू

गाझातील विद्यापीठात मोठा स्फोट झाला आणि इमारत क्षणात उद्धवस्त झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या हल्ल्यामुळे आजूबाजूच्या लोकांत मोठी भीती निर्माण झाली आहे. या हल्ल्यावर अमेरिकेनेही नाराजी व्यक्त केली आहे. हल्ला का केला याचे स्पष्टीकरण इस्त्रायलकडून मागितले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डेव्हिड म्हणाले, या प्रकरणाची आमच्याकडे फारशी माहिती नाही. त्यामुळे याबाबत जास्त काही सांगता येणार नाही. या हल्ल्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. या हल्ल्याचा बिर्गिट विद्यापीठानेही निषेध केला आहे.

दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. या युद्धाचे चटके जगालाही बसू लागले होते. त्यामुळे अन्य देशांच्या मध्यस्थीनंतर 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. बुधवारी युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशी हमासने इस्त्रायलच्या 16 ओलिसांची सुटका केली होती. मात्र हमासने अद्याप सगळ्या बंधकांची सुटका केलेली नाही असा आरोप इस्त्रायलने केला होता. तसेच गाझा पट्टीत कुणीही निर्दोष नाही असे इस्त्रायलने ठासून सांगितले होते.

Israel–Hamas War : इस्त्रायलकडून हल्ले सुरूच, गाझापट्टीत बॉम्बवर्षाव, 166 जणांचा मृत्यू

याआधी दोन्ही देशांतील युद्धविराम संपल्यानंतर इस्त्रायल पुन्हा आक्रमक पवित्र्यात आला होता. मागील महिन्यात गाझावर तुफान बॉम्बफेक करण्यात आली होती. या हवाई हल्ल्यात 178 लोकांचा मृत्यू झाला तर 589 पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाल्याचा दावा हमासने केला होता. मात्र याबाबत अद्यात अधिकृत माहिती त्यावेळी मिळाली नव्हती. दक्षिण गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांनी आपली घरेदारे सोडून निघून जावे असे इस्त्रायलने सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube