Israel Hamas War : युद्धविराम संपताच इस्त्रायलचा ‘एअरस्ट्राइक’; बॉम्बफेकीत 178 लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : युद्धविराम संपताच इस्त्रायलचा ‘एअरस्ट्राइक’; बॉम्बफेकीत 178 लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : आठवडाभराच्या युद्धविरामाची संपताच इस्त्रायलने (Israel Hamas War) कालपासून गाझा पट्टीवर तुफान बॉम्बफेक सुरू केली आहे. या हल्ल्यात हमास अतिरेकी संघटनेच्या तब्बल 200 ठिकाणांवर मारा (Hamas) करण्यात आला असून या हल्ल्यात 178 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हमासचा संपूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल (Israel Attack) मैदानात उतरला असून आता हल्ले अधिक तीव्र करण्यात आले आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांना (Israel Palestine Conflict) मात्र प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. इस्त्रायलने गाझातील काही (Gaza City) भाग रिकामा करण्याचा इशारा दिला होता. काहीही झालं तरी आम्ही युद्ध थांबवणार नाही, असे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.

Israel Hamas War : इस्त्रायलने धमकावताच ‘हमास’ची माघार; ‘त्या’ लोकांसाठी घेतला मोठा निर्णय

7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. या युद्धाचे चटके जगालाही बसू लागले होते. त्यामुळे अन्य देशांच्या मध्यस्थीनंतर 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. बुधवारी युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशी हमासने इस्त्रायलच्या 16 ओलिसांची सुटका केली होती. मात्र हमासने अद्याप सगळ्या बंधकांची सुटका केलेली नाही असा आरोप इस्त्रायलने केला होता. तसेच गाझा पट्टीत कुणीही निर्दोष नाही असे इस्त्रायलने ठासून सांगितले होते.

आता युद्धविराम संपल्यानंतर इस्त्रायल पुन्हा आक्रमक पवित्र्यात आला आहे. काल शुक्रवारी गाझावर तुफान बॉम्बफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हवाई हल्ल्यात 178 लोकांचा मृत्यू झाला तर 589 पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाल्याचा दावा हमासने केला आहे. मात्र याबाबत अद्यात अधिकृत माहिती मिळालेली नाही. दक्षिण गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांनी आपली घरेदारे सोडून निघून जावे असे इस्त्रायलने सांगितले आहे.

Israel- Hamas मध्ये ओलिसांच्या सुटकेबाबत करार, हमास 50 बंधकांना सोडणार, पण..

इस्रायल आणि हमास यांच्यातील करारानुसार सुटका होऊ शकणार्‍या 300 पॅलेस्टिनींची यादी इस्रायलने जारी केली होती. इस्त्रायली न्याय मंत्रालयाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या यादीमध्ये नाव, वय आणि त्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सुरुवातीला केवळ 150 कैद्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. या करारामागे इजिप्त, अमेरिका आणि कतार यांचा हात असल्याचे समजते. 4 दिवसांच्या युद्धविराम दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, ‘आम्ही युद्धात आहोत आणि आमचे सर्व लक्ष्य साध्य होईपर्यंत युद्ध सुरूच राहील. ते म्हणाले की, ओलिसांना परत करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी वचनबद्ध आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube