Israel Hamas War : इस्त्रायलने धमकावताच ‘हमास’ची माघार; ‘त्या’ लोकांसाठी घेतला मोठा निर्णय
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच (Israel Hamas War) आहे. मात्र आता हमासने डांबून ठेवलेल्या ओलिसांना सोडण्यासाठी काही काळासाठी युद्धविराम लागू करण्यात आला आहे. या काळात हमासकडून आणखी 17 बंधकांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 4 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसं पाहिलं तर हमासने (Hamas) या नागरिकांना काही सहजासहजी सोडलेलं नाही. हमासने दुसऱ्या टप्प्यात कैद्यांच्या सुटकेसाठी काही अटी इस्त्रायलसमोर ठेवल्या होत्या. मात्र, संतापलेल्या इस्त्रायलने पुन्हा गाझावर (Gaza City) हल्ला करण्याची धमकी दिली होती. या धमकीचा परिणाम झाला त्यानंतर हमासने माघा घेत ओलिसांना (Israeli Hostages) सोडले. याआधी शुक्रवारीही हमासने काही जणांना सोडले होते. यामध्ये पाच वृद्ध महिला आणि चार मुलांचा समावेश होता. तर दुसरीकडे इस्त्रायलनेही (Israel) 39 पॅलेस्टिनी महिला आणि मुलांना सोडले होते.
Israel- Hamas मध्ये ओलिसांच्या सुटकेबाबत करार, हमास 50 बंधकांना सोडणार, पण…
प्राथमिक तपासणी केल्यानंतर ज्यावेळी त्यांना रुग्णालयात नेले जाईल त्यावेळी त्यांच्याबरोबर आयडीएफचे सैनिक असतील. येथे या नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांना भेटता येईल. हमासने सहा वृद्ध महिला आणि सात मुलांना सोडल्याचे इस्त्रायल सरकारने म्हटले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू कार्यालयाने सांगितले की आमचे 13 नागरिक आणि 4 थायलँडचे नागरिक आहेत. त्यांच्या कु्टुंबियांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
युद्धविराम करारानंतर आतापर्यंत हमासने 42 बंधकांना सोडले आहे. पहिल्या टप्प्यात 25 बंधकांना इस्त्रायलला पाठविण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा 17 नागरिकांना सोडण्यात आले आहे. 50 दिवस हमासच्या कैदेत राहिल्यानंतर आता हे लोक पुन्हा त्यांच्या घरी निघाले आहेत. हमासने 50 ओलिसांना सोडणार असल्याचे सांगितले होते. ज्यावेळी युद्ध सुरू झाले तेव्हा हमासने 240 लोकांचे अपहरण केले होते. आता या लोकांना टप्प्याटप्प्याने रेडक्रॉस येथे आणून इस्त्रायली सैन्य दलाकडे दिले जात आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील करारानुसार सुटका होऊ शकणार्या 300 पॅलेस्टिनींची यादी इस्रायलने जारी केली आहे. इस्त्रायली न्याय मंत्रालयाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या यादीमध्ये नाव, वय आणि त्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सुरुवातीला केवळ 150 कैद्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. या करारामागे इजिप्त, अमेरिका आणि कतार यांचा हात असल्याचे समजते. 4 दिवसांच्या युद्धविराम दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘आम्ही युद्धात आहोत आणि आमचे सर्व लक्ष्य साध्य होईपर्यंत युद्ध सुरूच राहील. ते म्हणाले की, ओलिसांना परत करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी वचनबद्ध आहे.