Israel Hamas War : मदतीच्या प्रतिक्षेतील पॅलेस्टिनींवर इस्त्रायलचा हल्ला; 50 लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : मदतीच्या प्रतिक्षेतील पॅलेस्टिनींवर इस्त्रायलचा हल्ला; 50 लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) संपलेलं नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमास या दहशतवादी संघटनेचा पूर्ण बिमोड करण्याच्या उद्देशाने इस्त्रायल मैदानात (Israel Attack) उतरला आहे. आता पुन्हा एकदा इस्त्रायली सैन्याच्या मोठ्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. गाझा शहरात मदतीच्या (Gaza City) प्रतिक्षेत उभ्या असलेल्या पॅलेस्टिनींवर हल्ला (Palestine) करण्यात आला. या हल्ल्यात 50 लोकांचा मृत्यू झाला तर 250 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती शिफा रुग्णालयाच्या नर्सिंग विभागाचे प्रमुख डॉ. शफाई यांनी दिली.

या हल्ल्यात नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला याची खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुसऱ्या एका रुग्णालयाचे कार्यवाहक डॉ. सलाह यांनी सांगितले की या दुर्घटनेत 90 लोक जखमी झाले आहेत आणि तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयालाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दवाखान्यात वीजपुरवठा होत नाही. बॅटरीवर फार काळ कामकाज चालू राहिल याची शाश्वती नाही. युद्धाच्या पाच महिन्यांपासून गाझातील रुग्णालयांची अशीच परिस्थिती आहे.

Israel Hamas War : गाझात इस्त्रायलचे हवाई हल्ले; 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोकांचा बळी (Israel Palestine Conlflict) गेला आहे. या युद्धाचे चटके जगालाही बसू लागले होते. आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा,  कॉलेज, निवासी इमारती, रुग्णालयांचे प्रचंड नुकासान झाले आहे. तसेच दोन्ही बाजूच्या हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. आताही येथील परिस्थितीच चिघळलेलीच आहे. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत मात्र अद्याप यश मिळालेले नाही.

या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. पाच महिने होत आले तरीही युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्धामुळे परिसराचीही मोठी हानी झाली आहे. या गोष्टींचा विचार मात्र दोन्ही बाजूंनी होत नाही. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही. युद्ध अजूनही थांबलेलं नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज