तब्बल 20 वर्षांनंतर जपानने बदलल्या नोटा; ‘त्या’ घटना रोखण्यासाठी वापरलं खास टेक्निक

तब्बल 20 वर्षांनंतर जपानने बदलल्या नोटा; ‘त्या’ घटना रोखण्यासाठी वापरलं खास टेक्निक

Japan New Bank Notes : जपानमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर नवीन नोटा (Japan New Bank Notes) जारी करण्यात आल्या आहेत. बँक ऑफ जपानने या नव्या नोटांना चलनात आणण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या नोटांमध्ये 10 हजार येन, 5 हजार येन आणि 1 हजार येनच्या नोटांचा (Japan News) समावेश आहे. या चलनी नोटांमध्ये खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वाढत्या फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी थ्री डी होलोग्राम असणाऱ्या या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. जपानने सन 2004 नंतर पहिल्यांदा नवीन बँक नोट जारी केले आहेत.

बँक ऑफ जपानने बुधवारी या नव्या (Japan Economy) नोटा जारी केल्या. देशातील नागरिकांना या नव्या नोटा नक्कीच आवडतील असा विश्वास पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी (Fumio Kishida) व्यक्त केला. देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यात या नव्या चलनाचे मोठे योगदान राहील असेही किशिदा यावेळी म्हणाले. बँक ऑफ जपानचे गवर्नर काजूओ उएदा यांनी सांगितले की सध्या डिजिटल व्यवहारांचे चलन वाढत असले तरी सुरक्षित देवाणघेवाणीसाठी आजही रोख व्यवहार महत्त्वपूर्ण आहेत.

Japan Earthquake: भूकंपात अडकलेल्या भारतीय अभिनेत्याची तब्बल 18 तासांनी सुटका

नव्या नोटांमध्ये काय खास?

रॉयटर्स मधील एका रिपोर्टमध्ये जपानमधील स्थानिक मीडियाच्या हवाल्याने सांगितले आहे की नवीन नोटांचा चलनात समावेश करण्यात आला असला तरी आधीच्या नोटा चलनात कायम राहणार आहेत. या नोटांमध्ये वेगवेगळ्या दिशांना तोंड करून होलोग्राम तयार करण्यासाठी छापील पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे. तसेच या नोटामध्ये एका खास टेक्निकचा वापर करण्यात आला असून जगभरात हा पहिलाच प्रयोग आहे.

जपान वेंडींग मशीन मनुफॅक्चर्स असोसिएशनने सांगितले की 90 टक्के बँक एटीएम, ट्रेन तिकीट मशीन आणि रिटेल कॅश रजिस्टर नव्या नोटांचा स्वीकार करण्यास तयार आहेत. सध्याच्या डिजिटल जमान्यात मागील दहा वर्षांच्या काळात जपानमध्ये कॅशलेस पेमेंट तिप्पट वाढले आहे. रिपोर्टनुसार सन 2023 मध्ये उपभोक्ता खर्चाचा 39 टक्के हिस्सा कॅशलेस पेमेंटचा होता.

Japan : 33 हजारांहून अधिक घरांची ‘बत्ती’ गुल; भारताकडून आपत्कालीन हेल्पलाईन नंबर्स जारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज