शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या! जे. पी. गावित दिंडोरी लोकसभा लढण्यावर ठाम

शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या! जे. पी. गावित दिंडोरी लोकसभा लढण्यावर ठाम

JP Gavit will contest Lok Sabha : सांगली लोकसभेच्या जागेवरून (Sangli Lok Sabha) ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अजूनही तणाव आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मविआत सर्वकाही आलेबेल असल्याचं दिसत नाही. अशातच आता दिंडोरी मतदारसंघावरू (Dindori Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळेंना 35 लाखांचा तर अजित पवारांना दिलंय 63 लाखांचा कर्ज, सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती? 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या जागेसाठी माकप आग्रही होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शरद पवार गटाला दिली. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गावित यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याची विनंती त्यांना केली.

कोट्यावधींचे दागिने, एफडी, शेअर्सच्या धनी असलेल्या सुप्रिया सुळेंची संपत्ती तरी किती? 

गावित यांनी सातत्याने भाजपविरोधात लढा दिला आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. दिंडोरीची जागा माकपला द्यावी, अशी त्यांनी केली होती. मात्र, ती मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आता नाराज असलेले गावित हे आता निवडणूक लढवणार आहेत. गावित यांच्या भूमिकेमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

दरम्यान, उद्या गावित यांची दिंडोरित जाहीर सभा होणार आहे. शेतकरी संवाद सभा घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. उद्या जेपी पवार जाहीर सभेतून नक्की काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube