फडणवीसांमुळेच मोदींवर महाराष्ट्रात झोपायची वेळ; जरांगेंचा निशाणा!

फडणवीसांमुळेच मोदींवर महाराष्ट्रात झोपायची वेळ; जरांगेंचा निशाणा!

Manoj Jarange News : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर एवढ्या वेळा महाराष्ट्रात यायची वेळ आली असून ते झोपायलाच महाराष्ट्रात असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj jarange) यांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधला. मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी येत्या 4 जूनला पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे यांनी केलीयं. ते जालन्यातून माध्यमांशी बोलत होते.

4 जूननंतर शेअर बाजारात येणार तेजी! अमित शहांचं मोठं भाकीत, जाणून घ्या विश्लेषकांचं मत

मनोज जरांगे म्हणाले, राज्यात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रक्रियेत मी कुठेही नव्हतो. कोणाला निवडून आणा असं मी म्हणलो नाही. कोणालाचा आमचा पाठिंबा नव्हता, मी फक्त समाजाला एकच सांगितलं की पाडा, याबाबत कळणाऱ्यांना कळलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी इतक्या वेळा महाराष्ट्रात कधीच आले नव्हते. मागील दिवसांत ते माध्यमांसमोरही आलेले नव्हते, पण देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रात झोपायची वेळ आली असल्याची सडकून टीका मनोज जरांगे यांनी केलीयं.

वामिका-अकाय बाबतच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल विराट-अनुष्काने मानले पापाराझींचे आभार!

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतक्या वेळा महाराष्ट्रात प्रचारासाठी यावं लागतं आहे, हे महाराष्ट्रातील मराठा समाजाचं त्यांना डर आहे म्हणूनच ते येत आहेत. ते इतक्यावेळा महाराष्ट्रात कधीच आले नव्हते पण आता ते झोपायलाच इथं आहेत. सकाळी उठून लगेच व्यासपीठावर दिसत आहेत. यावेळी ते कोणाचाही प्रचार करतील ही वेळ भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळेच आली असल्याचीही टीका जरांगे यांनी केलीयं.

महाराष्ट्रातील मराठा समाज, दलित समाज, धनगर समाजासह मुस्लिम समाजाविषयी भाजपच्या मनात द्वेष आहे. भाजपच्या नेत्यांनी सर्वच समाजाचा करेक्ट कार्यक्रम केलायं. धनगर समाजबांधवांची मागणी आहे की अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावं, पण आम्ही एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचा पवित्रा भाजपच्या नेत्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सर्वच समाजाचा कार्यक्रम केला असल्याचीही टीका मनोज जरांगे यांनी केलीयं.

दरम्यान, येत्या 4 जून रोजी देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल हाती येणार आहे. त्याचं दिवशी जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे सकाळी 9 वाजल्यापासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकांचा निकाल आणि दुसरकीडे मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार असल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube