शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा चांगला पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा चांगला पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज

Monsoon 2024 Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट आली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. तर पुढील 48 तासात विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. यातच अनेकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे.

देशात यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. तसेच यंदा देशात समाधानकारक पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mohapatra) यांनी दिली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Monsoon Update) जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची स्थिती चांगली राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

देशात यंदा 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता असून यावेळी 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत हा पहिला अंदाज वर्तवला असून मे महिन्याच्या शेवटी हवामान विभागाकडून पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे.

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस तर 90 ते 95 टक्के पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी आणि 96 ते 104 टक्के पाऊस म्हणजे सरासरी इतका पाऊस. तर 105 ते 110 टक्के पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा अधिक आणि 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस सर्वाधिक पाऊस समजला जातो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज