महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट

Monsoon 2024 Updates : महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट

Monsoon 2024 Updates : मान्सून 2024 साठी (Monsoon 2024) खाजगी हवामान संस्था स्कायमेटने (Skymet) एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. यावेळी संपूर्ण देशात मान्सून सामान्य राहणार असून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. स्कायमेटनुसार, यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 868.6 मिमी पावसाची शक्यता आहे.

तर या अंदाजानुसार यावेळी देशात पावसाची टक्केवारी 96-104 राहण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी देशात मान्सून उशिरा एन्ट्री करू शकतो. याचे कारण म्हणजे ‘अल निनो’ ते ‘ला नीना’मध्ये बदल असल्याचे सांगितले जात आहे. स्कायमेटच्या मते, पहिल्यापेक्षा हंगामाच्या उत्तरार्धात परिस्थिती चांगली असेल. देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात पुरेसा आणि चांगला पाऊस अपेक्षित आहे.

या राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता

स्कायमेटच्या मते, यावेळी महाराष्ट्रासह (Maharashtra) मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाची अपेक्षा कमी आहे. तर मान्सूनच्या सुरुवातीला ईशान्य भारतात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. उत्तर भारतात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांची चांगली संख्या आहे. देशातील जवळपास निम्मी शेतजमीन सिंचनासाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे, सिंचनाचे दुसरे कोणतेही साधन नाही. या भागात भात, बाजरी, ऊस, कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जातात.

लंकेंनी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी बघावे, भाजपचा हल्लाबोल

पावसाळ्यातही उष्णतेची लाट कायम राहणार

यावेळी देशात मान्सूनसोबतच उष्णतेची लाट देखील कायम रहाणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, ऑगस्ट ते जून या कालावधीत देशातील काही भागात 10 ते 20 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे हा कालावधी 4 ते 8 दिवसांचा असतो.

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला रेडी पण, 7 मतदारसंघात धास्ती; तिकीट कुणाला मिळणार ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube