Download App

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, राज्यात पावसाचा जोर ओसरला; जाणून IMD अलर्ट

Maharashtra IMD Rain Alert : मे महिन्यातच राज्यात दाखल होणाऱ्या मान्सूनने आता शेतकऱ्यांच्या चितेंत वाढ केली आहे. राज्यातील (Maharashtra) अनेक

  • Written By: Last Updated:

Maharashtra IMD Rain Alert : मे महिन्यातच राज्यात दाखल होणाऱ्या मान्सूनने आता शेतकऱ्यांच्या चितेंत वाढ केली आहे. राज्यातील (Maharashtra) अनेक भागात पावसाचा जोर कमी झाल्याने अधीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दरवर्षी जुन महिन्यात राज्यात मान्सून दाखल होतो मात्र यंदा मे महिन्यात मान्सूनने (Monsoon) एन्ट्री घेतली होती. यामुळे यंदा राज्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र आतापर्यंत मराठवाडा आणि राज्यातील इतर काही भागात पावसाचा जोर कमी असल्याने चांगल्या पावसाची शेतकरी प्रतिक्षा करत आहे. यातच आता आयएमडीने (Maharashtra IMD Rain Alert) राज्यासाठी नवीन अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सध्या मान्सूनची आवस्था कमी झाली असून पुढील  दोन आठवडे राज्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सून सामान्य स्थानापेक्षा अधिक उत्तरेकडे सरकरल्याने मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. 6 ऑगस्टनंतर दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन; लता मंगेशकर पुरस्कारांसह 60 आणि 61 वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार 

शेतकऱ्यांना मोठा फटका

मराठवड्यात ऐन हंगामाध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. मराठवाड्याती अनेक भागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला नसल्याने आता शेतकऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

follow us