हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन; लता मंगेशकर पुरस्कारांसह 60 आणि 61 वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

Marathi Film Awards : राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 या (Lata Mangeshkar Awards) पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, 2024 चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर 2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे.
या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. याशिवाय, 60 आणि 61 वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शुभहस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ठिकाण:- वरळी डोम, एस व्ही पी स्टेडियम
तारीख:- 5 ऑगस्ट 2025
वेळ:- सायंकाळी 4 वाजता
– सर्व पत्रकारांनी B गेट क्रमांक 4 ने आत यावे
– प्रसार माध्यामांसाठी live streming साठी link देण्यात येईल.
OB Van parking- D Gate (आणि व्हॅनिटी वॅन च्या बाजूला)व्यवस्था असेल.
‘दशावतार’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज! टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
RSVP:
रेश्मा ज्ञाते
88792 11326
पल्लवी सप्रे
9004906984