एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! तानाजी सावंतांच्या भावाची शिवसेनेला सोडचिठ्ठी

Big blow to Eknath Shinde Shivsena Solapur District Leader Shivaji Savant Resine with 11 Officers : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच अनेक नेत्यांकडून सोईनुसार पक्षाबदलत आहेत. त्यात आता एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे सोलापूरातील नेते आणि शिंदेचे जवळचे व विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेले शिवाजी सावंत यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ आहेत.
काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हजारो शिवसैनिकांचा ठिय्या; नेमकं प्रकरण काय?
तानाजी सावंतांच्या भावाची शिवसेनेला सोडचिठ्ठी
शिवाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. तसेच ते शिंदेचे जवळचे व विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्याचबरोबर शिवाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी देखील आपले राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सोलापूरात शिवसेनेला मोठे खिंडार पडला आहे.
चमत्कार! भारतात सापडला जगातील सर्वात दुर्मिळ ब्लडग्रुप; जाणून घ्या CRIB ची स्टोरी
सावंतांच्या नाराजीचं कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून सावंत शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पक्षातील अंतर्गत गटाबाजीला कंटाळून त्यांना हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. पक्षातील निर्णयांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवाजी सावंतांसह राजीनामे दिलेल्या पदाधिकऱ्यांमध्ये जिल्हा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह काही तालुका प्रमुखांचा समावेश आहे. त्यानंतर आता ते कोणत्या पक्षात जाणार या सर्व चर्चांना उधान आलेले आहे. त्यात ते ठाकरे गटमध्ये जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे.