IMD Rain Alert : राज्यात वेळेपूर्वीच दाखल होणाऱ्या मान्सूनने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. याचा मुख्य कारण म्हणजे राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आधीच संकटात असणाऱ्या शेतकरी आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. राज्यात वेळेपूर्वीच मान्सून (Monsoon) दाखल झाल्याने मे महिन्यात दमदार पाऊस पाहायला मिळाला होता मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
तर आता हवामान विभागाचा (IMD Rain Alert) नवा अंदाज समोर आला आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील काही ठिकाणी तुरकळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.तर पुणे शहर आणि आसपासच्या भागात सध्या दमदार पावसाची शक्यता नाही. मात्र 20 जुलैनंतर या भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याने शेतकरी आता चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र मराठवाड्यात सध्यातरी दमदार पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. सध्या माहितीनुसार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिके सुकत असून वेळेवर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण होण्याची शक्यता आहे.