Download App

Operation sindoor गाजलं, सोबत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन नावांचा बोलबाला

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये

Sophia Qureshi and Vyomika Singh PC on Operation Sindoor  : भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकव्याप्त भागातील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, भारताने स्पष्ट संदेश दिला आहे की, हल्ल्याला योग्य उत्तर दिलं जाईल. आज पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यात आली. (Sindoor) ज्यामध्ये दोन महिला लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन्ही महिलांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मानवतेच्या भल्यासाठी ऑपरेशन सिंदूरनंतर काही तासांतच PM मोदींच्या हस्ते जागतिक अंतराळ परिषदेचं उद्घाटन

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर केलेल्या सर्जिकल एअर स्ट्राईकमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याची दोन महिला लष्करी अधिकारी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत, या दोन्ही महिला अधिकारी उपस्थित होत्या.

कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?

भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म वडोदरामध्ये १९८१ मध्ये झाला. बायोकेमिस्ट्रीमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. रिपोर्ट्सनुसार, सोफियाचे आजोबा हे लष्करात होते. त्यांच्या वडिलांनीही देखील लष्करात सेवा बजावली आहे.

कुरेशी यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. ३५ व्या वर्षीच त्यांनी आपल्या अमूल्य कामगिरीनं सर्वांना प्रेरीत केलं आहे. मार्च २०१६ मध्ये त्या लेफ्टनंट कर्नल होत्या. त्यावेळी त्यांनी बहुराष्ट्रीय सैन्य सरावात लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. हा भारताकडून केलेला आतापर्यंत सर्वात मोठा आणि महत्वाचा युद्धाभ्यास ठरला आहे. २ मार्च ते ८ मार्च या दरम्यान पुण्यात आयोजित या युद्धाभ्यासात १८ देश सहभागी झाले होते.

विंग कमांडर व्योमिका सिंग बद्दल जाणून घ्या

भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग या एक अनुभवी हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांना २५०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे आणि तिने सर्व प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत उड्डाण केलं आहे. पर्वत, वाळवंट, जंगले, सर्वत्र. व्योमिका केवळ तांत्रिकदृष्ट्या कुशल नाही तर ऑपरेशनल आघाडीवरही पूर्णपणे सक्षम आहेत.

कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या?

सोफिया कुरेशी म्हणाल्या की, ही कारवाई पहाटे १:०५ ते १:३० च्या दरम्यान झाली. पहलगाममध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या निष्पाप पर्यटकांसाठी ही कारवाई करण्यात आली. गेल्या ३ दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी निर्माण होत आहेत. हल्ल्यानंतरही हे उघडकीस आले आहे. आम्ही पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ लक्ष्ये निवडली होती आणि ती नष्ट केली आहेत. येथे लाँचपॅड आणि प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

follow us