Operation Sindoor : ‘काश मैं भी मारा जाता’; कुटुंब उद्धवस्त झाल्यानंतर ढसाढसा रडला मसूद अझहर

  • Written By: Published:
Operation Sindoor : ‘काश मैं भी मारा जाता’; कुटुंब उद्धवस्त झाल्यानंतर ढसाढसा रडला मसूद अझहर

Maulana Masood Azhar Reaction After Family Member Died In Operation Sindoor : दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत बहावलपुर येथे केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आले आहे. या मोठ्या धक्क्यानंतर अझहरचे आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून, ठार मारण्यात आलेल्यांच्या यादीत मसूद अझहरचा (Maulana Masood Azhar) भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही समावेश आहे. याशिवाय रौफ असगरच्या भावाच्या पत्नीलाही ठार करण्यात आले आहे. यानंतर आता मसूज अझहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली असे म्हणत या कारवाईत मीही मेलो असतो तर बर झालं असतं अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

कुटुंबाला जन्नत मिळाली पण मलाही मारलं असतं तर… 

भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आल्यानंतर अझहरच्या पायाखालची जमीन सरकली असून, त्याच्या डोळ्यातील आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून, हल्ल्या ठार झालेल्या माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली असे म्हणत या कारवाईत मीही मेलो असतो तर बर झालं असतं अशा भावना मसूद अझरनं व्यक्त केल्या आहेत.

भारताने फक्त ‘या’ 9 ठिकाणांनाच का टार्गेट केलं? ‘ऑपरेशन सिंदूर’चा खरा उद्देश जाणून घ्याच!

मसूद अझहर कोण आहे?

मसूद अझहरचा जन्म १० जुलै १९६८ रोजी पाकिस्तानातील पंजाबमधील बहावलपूर येथे झाला. तो ११ भावंडांमध्ये तिसरा आहे. त्यांचे वडील अल्लाह बख्श शब्बीर हे शाळेचे मुख्याध्यापक आणि दारुल उलूम दिवानियाचे मौलवी होते. मसूदने कराचीतील जामिया उलूम-उल-इस्लामिया मदरशात शिक्षण घेतले, जिथे त्याने कट्टरपंथी विचारांचा स्वीकार केला. तो प्रथम हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) मध्ये सामील झाला, ज्याने अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याविरुद्ध जिहाद लढला. आता ही संघटना कट्टरपंथी देवबंदी विचारसरणीचे पालन करते आणि भारतापासून काश्मीर हिसकावून पाकिस्तानात विलीन करण्याचे स्वप्न पाहते. तसेच मसूद अझहरला भारताच्या तुरूंगातून सोडवण्यासाठी 2002 साली कंधार विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते.

लेहमध्ये अडकलेल्या पर्यटकांना हॉटेल मोफत; ऑपरेशन सिंदूरनंतर हॉटेल संघटनांचा मोठा निर्णय

अम्मी को शहादत मिली

भारतीय हल्ल्यात संपूर्ण कुटूंब ठार झाल्यानंतर मसूद अझहरनं उर्दू भाषेत पत्र जाहीर करत भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्याने या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं असे म्हटलं आहे. तसेच या हल्ल्यात आपल्या अम्मीला शहादत मिळाल्याचंही मसूदनं म्हटलं आहे. अल्लाह तआलाचे काही खास लोक असतात… जे शहीद होतात, ते म्हणजे अल्लाहचे पाहुणे बनतात. माझ्या कुटुंबातील पाच जणांना ही खास संधी मिळाली… रात्रीच्या वेळी त्यांना ही शहादत मिळाली.

Operation sindoor गाजलं, सोबत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन नावांचा बोलबाला

पाच निष्पाप लहान मुलं, माझी आई जी खूप आजारी होती, माझे वडील, माझी बहीण आणि तिचा पती – सगळे या अपघातात शहीद झाले.माझ्या आईला कॅन्सर होता. ती अनेक दिवस आजारी होती. तिने मला सांगितलं होतं की, “माझ्या मृत्यूनंतर मला तुमच्या वडिलांजवळ दफन करा.” आणि आश्चर्य म्हणजे ती आपल्या पतीजवळच दफन झाली, दोन महिने अगोदरच. हे खूप मोठं नशीब होतं. एका अनुभवी माणसाने सांगितलं की, “हे निष्पाप मुलं, आई-वडील, बुजुर्ग लोक – हे सगळे खास होते. त्यांचा मृत्यू अचानक झाला पण त्यांच्या नशिबात हे लिहिलं होतं. त्यांचं शहिद होणं ही मोठी गोष्ट आहे. अल्लाहने त्यांना आपले पाहुणे बनवले.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube