गेल्या पाच वर्षांत केंद्रीय पोलीस सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये पन्नास हजारांहून अधिक जवानांनी नोकरी सोडली आहे किंवा ते निवृत्त झाले आहेत. तरस 658 जवानांनी आत्महत्या करत जीवन संपवले आहे. एका प्रश्नाच्या लेख उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती लोकसभेत दिली आहे.
अजितदादांना शरद पवारांसमोर येण्याची हिंमत होईना; मागून आले अन् निघूनही गेले
सरकारने गेल्या पाच वर्षांची आकडेवारी दिली
2016 मध्ये निमलष्करी दलातील 9228 जवानांनी व्हीआरएस (स्वैच्छा निवृत्ती) घेतली तर, 1712 जवान निवृत्त झाल्याचे सरकारने सांगितले. 2019 मध्ये 8908 जवानांनी VRS घेतली तसेच1415 जवान निवृत्त झाले. 2020 आणि 2021 मध्ये अनुक्रमे 6891 आणि 10,762 जवानांनी VRS तर, 2022 मध्ये सर्वाधिक सैनिकांनी नोकरी सोडल्याची माहिती राय यांनी लोकसभेत दिली.
सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 11,211 जवानांनी VRS घेतली तर 1169 जवान निवृत्त झाले. सर्व आकड्यांची गोळाबेरीज केल्यास गेल्या पाच वर्षांत एकूण 47000 निमलष्करी जवानांनी व्हीआरएस घेतली तर, 6336 जवान निवृत्त झाले आहेत.
सत्ता येते अन् जाते पण समाज, देश इथेच राहतो; पंतप्रधान मोदींचा मराठीतून टोमणा…
निमलष्करी दलात आत्महत्येच्या घटना
तर, दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत निमलष्करी दलात 658 जवानांनी आत्महत्या केल्याचेही सरकारकडून यावेळी सांगण्यात आले. यापैकी 2018 मध्ये 96 जवानांनी आत्महत्या केल्या, ज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 36 जवान, 32 बीएसएफ, 5 ITBP, 9 SSB, 9 CISF आणि 5 आसाम रायफल्सच्या जवानांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे 2019, 2020, 2021 आणि 2022 मध्ये ही संख्या अनुक्रमे 129, 142, 155, 136 होती. निमलष्करी दलांच्या कामकाजाचे वातावरण अधिक चांगले होण्यासाठी तसेच जवानांच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने पावले उचलली जात असल्याचेही सरकारने लोकसभेत सांगितले.