Download App

Pahalgam Attack : मोठी बातमी! पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी हेर पकडले, धक्कादायक माहिती समोर…

Pahalgam Attack 2 Spies Arrest In Panjab : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) लष्कर पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आहे. अगोदर देशात उपस्थित असलेल्या पाकिस्तानींना परत पाठवण्यात आले. आता देशात उपस्थित असलेल्या हेरांना अटक केली जात आहे. राजस्थाननंतर आता पंजाबमध्ये (Panjab) लष्कराला मोठं यश मिळालं आहे. येथून पोलिसांनी लष्कराच्या आदेशानुसार दोन हेरांना अटक (Spies Arrest In Panjab) केल्याची माहिती टीव्ही नाईनच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

लग्नसराईत पुन्हा सोन्याचे दिवस; सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर कुठल्या शरहात किती?

पाकिस्तानला गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अजनाला पोलिसांनी दोन हेरांना अटक केली आहे. जिंदर मसिह यांचा मुलगा फलकशेर मसिह आणि बलारवाल गावातील जुग्गा मसिह यांचा मुलगा सूरज मसिह अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. या दोन्ही हेरांचे पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयशी असलेले संबंध उघड झाले आहेत.

स्वप्नात कोण-कोणाला अडवतंय? अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या इच्छेवर…जितेंद्र आव्हाडांचा टोला

अटक केलेले हेर अमृतसर आर्मी कॅन्ट आणि अमृतसर एअरबेसशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवत होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याशिवाय अनेक वेळा झालेल्या संभाषणांची माहिती देखील मिळाली आहे. सध्या लष्कराने आपली कारवाई सुरू केली आहे आणि हेरांकडून सर्व गुपिते बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक केलेल्या आरोपींनी अमृतसरच्या अनेक भागांचे फोटोही पाकिस्तानला पाठवले होते. अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढे अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.

लष्कर अ‍ॅक्शन मोडमध्ये

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्य सातत्याने कारवाई करत आहे. यासोबतच अनेकांना अटक करण्यात आली आहे. अनेकांची चौकशी सुरू आहे. एक दिवस आधी राजस्थानमधून एका गुप्तहेराला अटक करण्यात आली. पोलिस गुप्तचर शाखेने पकडलेल्या पाकिस्तानी गुप्तहेराची ओळख 40 वर्षीय पठाण खान अशी झाली आहे. तो जैसलमेरमधील झिरो आरडी मोहनगडचा रहिवासी आहे. तो बराच काळ पाकिस्तानी गुप्तहेरांना लष्करी क्षेत्राचे व्हिडिओ आणि फोटो पाठवत होता. याशिवाय, एका पाकिस्तानी रेंजरलाही भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे, ज्याची चौकशी सुरू आहे.

 

follow us