पहलगाम हल्ल्यामागे कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड? धक्कादायक अपडेट

Kandahar plane hijack case Mastermind plotted Pahalgam attack : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कसून शोध (Pahalgam Attack) घातला जातोय. सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जातेय. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहेत. कंदाहार विमान अपहरण प्रकरणाचा (Kandahar plane hijack) मास्टरमाईंडच या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचं बोललं जातंय. राऊफ असगर हाच या हल्ल्यामागे असल्याचा दाट संशय आहे.
जैशच्या बहावलपूरच्या बालेकिल्ल्यात पहलगाम हल्ल्याबाबत कट शिजल्याची माहिती मिळत आहे. तर या हल्ल्याला गुप्तहेर यंत्रणेचं अपयश कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्याची आधीच कुणकुण लागली होती, त्यानंतर तसा अलर्ट देखील देण्यात आला होता. या माहितीनुसार श्रीनगरमधील जबरवानमधील दाचिगाम, निशात आणि परिसरात सर्च ऑपरेशन देखील राबवलं गेलं होतं.
ना नवरी… ना नवरदेव! तरीही धुमधडाक्यात लग्न, दिल्लीत आलाय ‘हा’ नवा ट्रेंड
परंतु या सर्च ऑपरेशनमध्ये काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे हे ऑपरेशन 22 एप्रिल रोजी थांबवलं गेलं अन् याच दिवशी पहलगाम हल्ला झाला. खरं तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कटरा – श्रीनगर रेल्वे सोहळा होता. पंतप्रधानांचा जम्मू काश्मीर दौऱ्यावर त्यांची नजर होती. परंतु हा दौरा रद्द झाल्याने त्यांचा प्लॅन फसला. काही स्थानिक दहशतवादी पर्यटकांमध्ये आधीपासूनच मिसळले गेले होते. या सर्व नियोजनानंतरच पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळतेय.
पाकिस्तानला आणखी एक धक्का! भारतानंतर आता ‘या’ देशांनीही पाकिस्तानी हवाई हद्द टाळली
कंदाहार विमान अपहरण प्रकरण
नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून अफगाणिस्तानात नेण्यात आले. हे विमान काठमांडूहून दिल्लीला येत होते. फ्लाईट क्रमांक IC-814 मध्ये 176 प्रवासी होते. अपहरणकर्ते प्रवाशांच्या वेशात विमानात चढले. काठमांडूहून विमानाचे अपहरण करून ते कंधारला नेण्यात आले. दरम्यान, विमान दुबई विमानतळावर इंधन भरण्यासाठी थांबवण्यात आले, जिथे 28 प्रवाशांना उतरवण्यात आले. त्यापैकी बहुतेक मुले आणि महिलांचा समावेश होता.