ना नवरी… ना नवरदेव! तरीही धुमधडाक्यात लग्न, दिल्लीत आलाय ‘हा’ नवा ट्रेंड

Fake Wedding Trend In Delhi : घरात जेव्हा लग्नाचे वातावरण असते, तेव्हा प्रत्येकाला एक वेगळाच उत्साह असतो. लोक लग्नाच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त असतात. पण आजकाल लोक लग्नाची जबाबदारी आणि काम टाळू (Fake Wedding Trend) इच्छितात. यातच दिल्लीने पुढाकार घेतला आहे. आजपर्यंत आपण सर्वांनीच लग्न पाहिलं आहे. मजा-मस्ती असते. सजावट असते, मेहंदी पण (Wedding Parties) असते. परंतु जर नवरा-नवरीच नसेल तर? कसं शक्य आहे. अशा लग्नाबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? परंतु सोशल मीडियावर या लग्नाच्या ट्रेंडने मात्र धुमाकूळ घातला आहे.
हा लग्नाचा ट्रेंड फेक वेडिंग ट्रेंड म्हणून ओळखला जात आहे. हा ट्रेंड नेमका काय आहे, तो इतका का लोकप्रिय होतोय? हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.
मोठी बातमी! पाकव्याप्त काश्मिरात पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासची एन्ट्री?, काय आहे सत्य
फेक वेडिंग ट्रेंड म्हणजे काय?
या पार्ट्यांमध्ये खरे वधू-वर नसतात, पण बाकी सर्व काही खऱ्या लग्नासारखे असते. म्हणजे अगदी मेहंदीपासून ते संगीत, हळदी, मजा आणि मस्ती, सजावट सगळं काही अगदी खरं असतं. या लग्नाचा उद्देश फक्त मनोरंजन आणि सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणे आहे.
खरं तर, एका सोशल मीडिया व्यावसायिकाने सांगितले की त्याने आणि सुमारे 100 तरुणांनी कुतुबमिनारसमोरील एका प्रीमियम रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये या पार्टीचा पुरेपूर आनंद घेतला. ड्रेस कोड ट्रेडिशनल होता. सर्वांनी लेहेंगा आणि कुर्ता असे पारंपारिक पोशाख घातले होते. रेस्टॉरंट पिवळ्या आणि गुलाबी रंगांच्या सजावटी, झेंडूच्या फुलांनी आणि झुंबरांनी सजवले होते. तिथे फोटो बूथ, लाईव्ह ढोल, पंजाबी आणि बॉलीवूड गाण्यांची प्लेलिस्ट आणि मेहंदी कलाकार होते. सगळं इतकं खरं होतं की, पहिल्या नजरेत कोणालाही वाटलं असतं की हा खरा लग्न सोहळा आहे.
भारताने हल्ला केल्यास अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर, पाकिस्तानची धमकी, कोण काय म्हणालं?
ऑनलाइन नोंदणी
या पार्ट्यांमध्ये 40 वर्षांवरील लोकही सहभागी होत आहेत. तो त्याच्या मित्रांसोबत बनावट लग्नात खऱ्या अर्थाने मजा करण्यासाठी येत असतात. जर तुम्हीही अशा पार्टीत सामील होण्याचा आणि एन्जॉय करण्याचा विचार करत असाल, तर यासाठी तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी सुमारे 550 रुपये प्रवेश शुल्क भरावे लागेल.
बनावट लग्नांचा हा ट्रेंड पाहून आता ‘फेक हळदी समारंभ’, ‘फेक रिसेप्शन’ आणि ‘फेक बॅचलर पार्ट्या’ देखील सुरू होत आहेत. काही इव्हेंट कंपन्या तर फक्त मनोरंजनासाठी पूर्ण बनावट लग्न पॅकेजेस देत आहेत. यामध्ये बारात, वरमाला आणि विदाई यांचा समावेश आहे. दिल्लीमध्ये सुरू झालेल्या या नवीन ट्रेंडवरून असे दिसून येते की, आजची तरुण पिढी केवळ पारंपारिक कार्यक्रमांचा आनंद घेऊ इच्छित नाही तर ती त्यांच्या पद्धतीने, मजा आणि सर्जनशीलतेने त्यांची पुनर्परिभाषा देखील करत आहे.