तुमच्या खास दिवसाला बनवा सुरक्षित; जाणून घ्या Wedding Insurance चं महत्व
Wedding Insurance : भारतात लग्न एक उत्सव म्हणूनच साजरं केलं जातं. हा प्रसंग एकदम खास व्हावा यासाठी लोकांकडून अनेक आयडिया वापरल्या जातात. यासाठी वेडिंग प्लॅनरची देखील मदत घेतली जाते. वेडिंग प्लॅनर लग्नाची सर्व व्यवस्था करतात. विवाह सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम असो की भोजन व्यवस्था सर्व काही नियोजपूर्वक केले जाते.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने लग्नासंबंधी हैराण करणारी आकडेवारी समोर आणली आहे. यानुसार या वर्षात (Wedding Insurance) लग्न समारंभातून तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली. वित्तीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लग्न केवळ एक समारंभ नाही तर हा एक वेगाने विकसित होणारा उद्योग आहे. ग्लोबल वेडिंग सर्विसेचा बाजार 2020 मध्ये 160.5 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. आता सन 2030 पर्यंत हे मार्केट 414.2 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आता विवाह सुद्धा एक मोठा बिजनेस झाला आहे.
Crop Insurance Scheme : आगाऊ पैसे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करणार; कृषिमंत्री मुंडेंचा इशारा
वेडिंग इन्शुरन्स काय आहे
आज बाजारात अनेक प्रकारचे इन्शुरन्स उपलब्ध आहेत. यामध्ये एक वेडिंग इन्शुरन्स आहे. यामध्ये तुम्ही लग्नाला सुरक्षित करू शकता. लग्नात अनपेक्षित खर्चापासून वाचण्यासाठी अनेक जण वेडिंग इन्शुरन्स करतात. उदाहरणार्थ लग्न समारोहात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा ऐनवेळी वेंडर गायब झाल्यास अशा वेळी इन्शुरन्स कामाला येतो. या इन्शुरन्सचा प्रिमियम (Insurance Premium) समारंभाचा आकार आणि सर्व्हिस यांवर अवलंबून असतो. जर लग्नात जास्त सर्व्हिस कव्हर केल्या जात असतील तर प्रीमियम सुद्धा जास्त द्यावा लागेल.
या परिस्थितीत लाभ मिळणार नाही
वेडिंग इन्शुरन्स मध्ये प्रत्येक गोष्ट कव्हर केली जाणार नाही. जर लग्नाच्या बाबतीत अचानक माईंड चेंज, बजेट जास्त असणे किंवा अन्य कोणत्याही वैयक्तिक निर्णयाला बाहेर ठेवले जाते. त्यामुळे विमा घेण्याआधी नियम व्यवस्थित माहिती करून घ्या. कोणत्या परिस्थितीत विमा कंपन्या लाभ देण्यास नकार देतात हे आधी माहिती करून घ्या.
लग्नाच्या दिवसाला सुरक्षित करण्याचे प्लॅनिंग नियोजनपूर्वक सुरू होते. त्यामुळे बाजारातील नावाजलेल्या विमा कंपन्या किंवा स्पेशलाईजेड वेडिंग इन्शुरन्स प्रोव्हायडर सारखे प्लॅटफॉर्म सुरूवात करण्यासाठी उत्तम आहेत असे युडब्ल्यू, क्लेम प्रॉपर्टी अँड casualty आयसीआयसीआय लोंबार्डचे प्रमुख गौरव अरोडा यांनी सांगितले.
होम लोन घेताय? मग, बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या अन् व्हा हुशार!