PM Modi On Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण देशाला हादरवून ठेवणारा ठेवणाऱ्या या घटनेला आज 22 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. भारतीय सैन्य आणि जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना जोरदार प्रत्युत्तर दिला आहे.
पहलगाम येथे एका वर्षानंतर (Pahalgam Attack) पुन्हा एकदा पर्यटकांनी गर्दी दिसून येत आहे. तर दुसरीकडे भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिला आहे. पहलगाम हल्लाच्या वर्षपूर्तीला पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत शत्रू राष्ट्राना इशारा दिला आहे. कोणीही मर्यादांचे उल्लंघन केल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल असं पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे.
Remembering the innocent lives lost in the gruesome Pahalgam terror attack on this day last year. They will never be forgotten. My thoughts are also with the bereaved families as they cope with this loss.
As a nation, we stand united in grief and resolve. India will never bow to…
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी एक्सवर लिहिले की, गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात नाहक बळी ठरलेल्या निष्पाप जीवांचे आज स्मरण करत आहोत. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाचा सामना करत असलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या दुःखातही मी सहभागी आहे. एक राष्ट्र म्हणून, आम्ही या शोकाच्या प्रसंगी आणि आमच्या निर्धारात एकजूट होऊन उभे आहोत. भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे हे नीच मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.
Video : Get Out from here… महिलेने मंत्री महाजनांना झापले; महिला आरक्षण मोर्च्यात काय घडलं?
पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदुर राबवत 100 पेक्षा जास्त दहशतवादींच्या ठिकाण्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
