Download App

Pahalgam Attack : PM मोदी अन् गृहमंत्री अमित शाह राजीनामा देणार का? काँग्रेसचा सवाल

Congress On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात

  • Written By: Last Updated:

Congress On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात काँग्रेसकडून (Congress) केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Attack) सुरक्षेमध्ये काही चुका झाल्या असल्याची बाब केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठकीत मान्य केल्यानंतर काँग्रेसने या प्रकरणावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) राजीनामा देणार का? असा प्रश्न देखील विचारला आहे. आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या निषेधात सामील झाले होते. यानंतर काॅंग्रेसकडून एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. सुरक्षेत चूक कशी झाली? गुप्तचर यंत्रणा कशी अपयशी ठरली? दहशतवादी सीमेवरून कसे घुसले? 28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का? या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेतील का? असे पश्न काँग्रेसने केंद्र सरकारला विचारले आहे.

सरकारवर टीका करत काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, आम्ही या भयानक दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आम्हाला सरकारकडून कडक प्रतिसाद हवा आहे, काँग्रेसने या संदर्भात पूर्ण पाठिंबा दिला आहे. आम्हाला माहिती आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा जाळे आहे, पहलगाम पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, म्हणून न्याय आणि जबाबदारीची आवश्यकता आहे.

तर दुसरीकडे आज राहुल गांधी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांची भेट घेतली आणि दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा केली. मी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी येथे आलो आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सर्व लोकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि ते देशासोबत आहेत. असं राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी जखमींपैकी एकाला भेटलो पण इतरांना भेटू शकलो नाही कारण ते येथून निघून गेले होते. माझे प्रेम आणि आपुलकी त्या सर्वांसोबत आहे ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.

कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पीएफ खात्याच्या हस्तांतरण प्रक्रियेचे नियम बदलले; जाणून द्या सर्वकाही

मंगळवारी 22 एप्रिल दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. 28 पर्यटकांपैकी 6 पर्यटक महाराष्ट्राचे होते. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील 6 मृत्यू झालेल्या  पर्यटकांना प्रत्येकी सहा लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

follow us