Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या (Jammu Kashmir Attack) बैसारन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना (Pahalgam Terror Attack) त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून जम्मू काश्मिरात इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला नव्हता. परंतु या हल्ल्याने जम्मू काश्मिरच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल झालेला हल्ला सुद्धा अतिशय भीषण असाच होता. या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एक पर्यटक त्यावेळी व्हिडिओ तयार करत होता. त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळी मारण्याआधी त्याचं नाव, ओळख आणि धर्म कोणता हे विचारलं. यात ज्यांनी आपलं नाव हिंदू सांगितलं त्यांना या दहशतवाद्यांनी थेट गोळ्या घातल्या. हिंदुंना अगदी पद्धतशीरपणे गोळ्या घालून ठार करण्यात आले.
आपली ओळख कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी दहशतवाद्यांनी लष्कराची वर्दी घातली होती. त्यामुळे सुरुवातीला कुणालाच त्यांचा संशय आला नाही. पण थोड्या वेळानंतर त्यांनी जेव्हा हिंदू पर्यटकांना ओळख विचारून त्यांच्यावर फायरिंग सुरू केली तेव्हा मात्र पळापळ सुरू झाली. दहशतवाद्यांनी अशा हिंदू पुरुषांना मारलं जे त्यांच्या परिवाराबरोबर येथे आले होते. याठिकाण जीवाच्या आकांताने पळापळ आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 2019 मध्ये ही संघटना अस्तित्वात आली होती. यानंतर या संघटनेतील अतिरेकी काश्मीरमध्ये सातत्याने हल्ले करत आहेत. ही संघटना भारतासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील पंधरा वर्षांच्या काळात या राज्यात 11 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांत तब्बल 227 निरपराध लोकांचा बळी गेला आहे. सन 2000 नंतर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती घेऊ या..
21 मार्च रोजीच्या रात्री अनंतनाग जिल्ह्यातील छत्तीसिंगपोरा गावात अतिरेक्यांनी अल्पसंख्याक शीख लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 36 लोकांचा मृत्यू झाला होता.
ऑगस्ट 2000 मध्ये पहलगाममधील नूनवान बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन डझन अमरनाथ यात्रेकरूंसह 32 लोक मारले गेले होते.
जुलै 2001मध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला. यावेळी अनंतनाग मधील शेषनाग बेस कॅम्पवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 13 लोकांचा बळी गेला होता.
1 ऑक्टोबर 2001 या दिवशी श्रीनगरमधील जम्मू काश्मीर राज्य विधिमंडळ परिसरात आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात 36 लोक मारले गेले होते.
2002 मध्ये काश्मीरातील चंदनवारी बेस कॅम्पवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 11 अमरनाथ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.
23 नोव्हेंबर 2002 रोजी जम्मू श्रीनगर राज्य महामार्ग दक्षिण काश्मीरमधील लोअर मुंडामध्ये एक आयईडी स्फोटात 9 सुरक्षा कर्मचारी, 3 महिला आणि 2 लहान मुलांसह 19 लोकांचा मृत्यू झाला होता.
Video: तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो… मंजुनाथ यांच्या पत्नीला दहशतवादी काय म्हटले ?
23 मार्च 2003 रोजी पुलवामा जिल्ह्यातील नंदीग्राम गावात 11 महिला आणि दोन लहान मुलांसह कमीत कमी 24 काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली.
13 जून 2005 रोजी पुलवामातील एका सरकारी शाळेच्या समोर गर्दी असणाऱ्या बाजारात विस्फोटकानी भरलेल्या एका कारचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थी, 3 सीआरपीएफ अधिकाऱ्यांसह 13 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
12 जून 2006 मध्ये कुलगाममध्ये 9 नेपाळी आणि बिहारी मजूर अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले. या लोकांचे अतिरेक्यांनी टार्गेट किलिंग केले होते.
10 जुलै 2017 रोजी कुलगाम मध्येच अमरनाथ यात्रा बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ लोकांचा मृत्यू झाला होता.
22 एप्रिल 2025 म्हणजेच काल पहलगाम मध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.