Download App

Pahalgam Terror Attack : विश्वासघातकी अन् अमानवी हिंसक..,; पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचं ट्विट

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध बॉलिवूड किंग शाहरुख खान याने ट्विट शेअर करत केलायं.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) हल्ला करत नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला असून हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत असतानाच आत बॉलिवूड क्षेत्रातूनही निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुन खान याने ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

शाहरुखने ट्विटमध्ये म्हटलं, पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवी हिंसक घटनेमुळे होणारं दु:ख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा काळात, आपण केवळ देवाकडे त्या पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि आपल्या अंत:करणातून शोक व्यक्त करू शकतो. हे दु:खद प्रसंग झेलणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी माझ्या मनापासून संवेदना आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण सर्वजण एकत्र, बळकट उभे राहू आणि या अमानवी कृत्याविरुद्ध न्याय मिळवू” असं ट्विट शाहरुख खानने केलंय.

गृहमंत्री अमित शाहंकडून नागरिकांना धीर; रस्त्यांवर शांतता, कशी आहे पहलगामध्ये हल्ल्यानंतरची परिस्थिती?

काश्मीरमधील पहलगाममध्ये निःशस्त्र पर्यटकांना मारणाऱ्या दहशवादी आणि त्यांच्या आकांच्या कृतीचं प्रत्युत्तर जोरदार पद्धतीने दिले जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. कठोर शब्दांत इशारा देत एकप्रकारे सिंह यांनी ऑपरेशन पहलगामची घोषणाच केली आहे. सरकार आवश्यक आणि योग्य असे प्रत्येक पाऊल उचलेल. दहशतवादाविरुद्धचा हल्ला किती जलद आणि तीव्र असेल याचे संकेतही यावेळी सिंह यांनी दिले. ज्यांनी ही घटना घडवून आणली त्यांनाच नाही तर, पडद्यामागे हा रक्तरंजित खेळ खेळणाऱ्यांनाही अटक केली जाईल असा गर्भित इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला.

follow us