Pahalgam Terror Attack Live Updates : जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. विमानतळावर उतरताच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्याबरोबर बैठक घेतली. आता या दहशतवाद्यांविरुद्ध सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यंत्रणांना तीन संशयित अतिरेक्यांचे स्केच जारी केले आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives in Delhi after cutting short his Saudi Arabia visit in view of the #PahalgamTerroristAttack in Kashmir
(Source – ANI/DD) pic.twitter.com/5WAk8kL0g5
— ANI (@ANI) April 23, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्याचंं सांत्वन केलं. कुटुंबियांचं दुःख पाहून गृहमंत्री देखील निशब्द झाले होते.
#WATCH | Union Home Minister Amit Shah meets the families of the victims of the Pahalgam terrorist attack in Srinagar, J&K pic.twitter.com/z7XvMMcadE
— ANI (@ANI) April 23, 2025
जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २८ पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली.या हल्ल्यानंतर पुण्यात जगदाळे कुटुंबियांनी यांची प्रतिक्रिया दिलीये.
जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. #PahalgamTerroristAttack #Pune #IndianArmy #Kashmir #TerroristAttack @mohol_murlidhar @Dev_Fadnavis @narendramodi @AmitShah pic.twitter.com/nrrZ5ZROwf
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 23, 2025
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
Pahalgam Terror Attack : या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली. या हल्ल्यानंतर पुण्यात जगदाळे कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली.
Pahalgam Terror Attack : पुण्यातील जगदाळे कुटुंबियांची प्रतिक्रिया #PahalgamTerroristAttack #pahalgamattack #PahalgamTerrorAttack #JammuKashmir #JammuAndKashmir #JammuKashmirAttack pic.twitter.com/0M9Xz6J2vl
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 23, 2025
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
Uri Encounter : आज जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा (Uri Encounter) डाव हाणून पाडला. या दरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. ही घटना बारामुला जिल्ह्यातील उरी नाला परिसरात घडली.
J&K | Heavy exchange of fire between security forces and terrorists, two terrorists have been eliminated, infiltration bid foiled by the security forces in the ongoing Operation in Baramulla. Large quantity of weapons, ammunition and other war-like stores have been recovered from… pic.twitter.com/OS3opx8lLg
— ANI (@ANI) April 23, 2025
Raj Thackeray on Pahalgam Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एक्सवर पोस्ट लिहीत त्यांनी या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी..
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली...
ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र…— Raj Thackeray (@RajThackeray) April 23, 2025
Pahalgam Attack : पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांत काही जण पाकिस्तानचे असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. कुणाला शंका येणार नाही यासाठी स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. पोलिसांच्या वेशातल्या स्थानिक लोकांनाी या दहशतवाद्यांना मदत केल्याची माहितीही समोर आली आहे.
Kashmir pahalgam Terror Attack : या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह आज सायंकाळी पुण्यात आणण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. विशेष विमानाने आज सायंकाळी 6 वाजता मृतदेह आणण्यात येतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तारिक कर्रा यांच्याबरोबर चर्चा केली आहे. पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.