Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव प्रचंड (India Pakistan Tension) वाढला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत. यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडणारे पाच निर्णय घेतले. यातल्या एका निर्णयाने (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. भारताने सिंधू पाणीवाटप करार मोडून जर (Indus Water Treaty) पाकिस्तानचे पाणी रोखले तर याला अॅक्ट ऑफ वॉर असे समजले जाईल अशी धमकी पाकिस्तानने केली आहे.
भारतात सध्या पाकिस्तानला जोरदार धडा शिकवण्याची मागणी होत आहे. भारत सरकारने अद्याप असा काही निर्णय घेतला नसला तरी पाकिस्तानचे नाक (Jammu Kashmir Attack) दाबणारे निर्णय घेतले आहेत. आता युद्ध होईल की नाही याबाबत आताच काही सांगता येणार नाही. तरीसुध्दा भूतकाळात पाहिलं तर प्रत्येक बाबतीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाच क्षेत्र असे आहेत जिथे पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे.
पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिकेची.. काय म्हणाल्या, गुप्तचर विभागाच्या प्रमुख?
भारत आणि पाकिस्तानमधील प्रति व्यक्ती उत्पन्नाची माहिती पहिली तर येथे भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. 2024 मध्ये भारतातील प्रति व्यक्ती उत्पन्न 2711 डॉलर इतके होते. त्याचवेळी पाकिस्तानी प्रति व्यक्ती उत्पन्न 1581 डॉलर होती. 1960 मध्ये दोन्ही देशांचे प्रति व्यक्ती उत्पन्न समान होते. या वर्षात भारताचे प्रति व्यक्ती उत्पन्न 85 डॉलर तर पाकिस्तानचे 82 अब्ज डॉलर उत्पन्न होते.
भारतातील लोकांचे सरासरी वयोमान वाढत चालले असून याबाबतीतही भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. सन 1960 मध्ये भारतातील लोकांचे आयुर्मान सरासरी 45.6 वर्षे इतकी होती. तर पाकिस्तानचे सरासरी आयुर्मान 44.1 वर्षे होते. 2024 मध्ये भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. सद्यस्थितीत भारतीय लोकांचे सरासरी आयुर्मान 72.2 वर्षे इतके आहे. तर पाकिस्तानातील लोकांचे सरासरी आयुर्मान 67.8 वर्षे इतकी आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साक्षरता दरात मोठा फरक आहे. 15 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे सरासरी साक्षरता दर 80 टक्के आहे. ही आकडेवारी 2023 मधील आहे. दुसरीकडे 2021 मध्ये पाकिस्तानात साक्षरता दर 58 टक्के इतकाच होता.
भारत सरकार आपल्या नागरिकांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जीडीपी मधील मोठा हिस्सा खर्च केला जातो. याबाबतीत पाकिस्तान भारताच्या खूप मागे आहे. सन 2023 मधील आकडेवारीनुसार भारत सरकार आपल्या जीडीपी मधील 4.1 टक्के निधी शिक्षणावर खर्च करतो. पाकिस्तान त्याच्या एकूण जीडीपीतील फक्त 1.9 टक्के निधी शिक्षणावर खर्च करतो. भारताच्या तुलनेत पाकिस्तानात गरीबी आणि निरक्षरता खूप जास्त आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते भ्रष्टाचार करण्यात आणि दहशतवादाला पोसण्यातच धन्यता मानतात म्हणून आज पाकिस्तान नावाच्या देशाची अशी अवस्था झाली आहे.
भारतात आरोग्यासाठीच्या मुलभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत. याचाच परिणाम म्हणून जगातील अनेक देशांतील रुग्ण भारतात येऊन उपचार घेत आहेत. भारत जगातील एक वेगाने विकसित होणारा मेडिकल टूरिजम देश ठरला आहे. 2021 मधील आकडेवारी पाहिली तर भारत आरोग्यावर जीडीपीच्या 3.4 टक्के पैसे खर्च करत आहे. पाकिस्तान फक्त 3 टक्के खर्च आरोग्यावर करत आहे.