Download App

पहलगामच्या हल्लेखोरांची ओळख पटली; चार दहशतवाद्यांचे फोटो समोर, तपासात धक्कादायक माहिती..

राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.

Jammu Kashmir Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची घटनेनंतर आता तपास यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीए आणि जम्मू काश्मीर पोलीस मिळून जंगलात या अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या गुन्हेगारांचे एक स्केच जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं अशी माहिती नवी माहिती तपासातून समोर आली आहे. दहशतवादी मुजफ्फराबाद आणि कराचीच्या सतत संपर्कात होते असाही दावा केला जात आहे.

या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटकांना धर्म विचारून ते हिंदू असल्याची खात्री करून त्यांना मारण्यात आलं. या विकृत मानसिकतेवर समाजाच्या प्रत्येक स्तरातून कठोर टीका केली जात आहे. देशभरात या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. देशभरात ठिकठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत. सरकारी पातळीवर हालचाली वाढल्या आहेत.

Pahalgam Terrorists Attack : हिंदू अन् मुस्लिम वेगळे..,; पाकिस्तानी आर्मी चीफच्या भाषणाने ठिणगी? काश्मीरात नरसंहार

दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा देणारच : अमित शाह

या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह कालच जम्मू काश्मीरला रवाना झाले. येथे अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यानंतर आज सकाळी श्रीनगरमध्ये हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. मयतांना श्रद्धांजली अर्पित केली. यानंतर सोशल मिडिया एक्सवर पोस्ट लिहित अमित शहा म्हणाले, अत्यंत जड अंतःकरणाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पित करतोय. भारत दहशतवादासमोर कधीच झुकणार नाही. या भ्याड हल्ल्याच्या दोषींना सोडले जाणार नाही असा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी दिला.

पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष विमानानं पुण्यातील पर्यटकांना आणणार; हेल्पलाईन नंबर जारी करत मोहोळांनी काय सांगितलं

follow us