Panic rises in karnataka over cases of heart attack long ques in hospitals: डान्स करताना, जीममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिलेत. काही क्षणात आनंदीत असलेली तरुण व्यक्ती जगाचा निरोप घेते. अशा पद्धतीने मृत्यू होण्याची संख्या देशात वाढतेय. आता कर्नाटकातील (karnataka) एका जिल्ह्यात हार्ट अटॅकने (heart attack) मृत्यू होण्याची संख्या अचानक वाढलीय. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरलीय आणि ते तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये रांगा लावत आहेत. हे संपूर्ण प्रकरण आपण बघुया…
मृत्यूही तरुणांचीही संख्या, हसन जिल्ह्यात सर्वाधिक संख्या
हे मृत्यू वाढत आहेत, कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात. गेल्या चाळीस दिवसांमध्ये 23 जणांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झालाय. यामध्ये तरुणांची संख्याही आहे. 19 ते 25 वर्ष वयोगटातील सहा जणांचा, तर 25 ते 45 वर्ष वयोगटातील आठ जणांचा हार्ट अॅटकने मृत्यू झालाय. त्यामुळे लोकांमध्ये घबराहाटीचे वातावरण आहे. यामुळे म्हैसूरमधील प्रसिद्ध जयदेव हार्ट हॉस्पिटलमध्ये लोक तपासणीसाठी येतायत. हॉस्पिटलबाहेर लोकांच्या रांगा लागल्यात. दिवसभर रांगेत उभे राहिल्यानंतर ह्द्याचा चाचण्या केल्या जात आहेत. याबाबत जयदेव हॉस्पिटल प्रशासन म्हणते की, संपूर्ण राज्यात हृदय विकाराचे रुग्ण वाढलेत. त्यामुळे लोक घाबरलेत. विशेषतः राज्यातील हसन जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेत. जयदेव हॉस्पिटलमध्ये ह्दयाच्या चाचण्या करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आधीच उपचार सुरू असलेल्या रुग्णांना उपचार देण्यात अडथळे निर्माण झालेत.
केवळ एकदा ह्रदय तपासणी फायद्याची नाही
याबाबत जयदेव हॉस्पिटलचे अधीक्षक के.एस. सदानंद म्हणाले, माध्यमांमध्ये बातम्या पाहून लोक घाबरून हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी येतायत. केवळ एकदाच जयदेव हॉस्पिटलमध्ये तपासणी करून उपयोग नाही. दुसऱ्या रुग्णालयांमध्ये जावून ह्दयाची तपासणी केली पाहिजे. केवळ हृदय तपासणी करून भविष्यातील समस्या टाळता येणार नाही. हृदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक असल्याचा सल्लाही के. एस. सदानंद यांनी दिलाय.
हसन जिल्ह्यातील हार्ट अटॅक केसची स्वतंत्र स्टडी होणार
राज्यात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेल्या महिन्यात एक चौकशी समिती स्थापन केली. चौकशी समितीचे अध्यक्ष जयदेव हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. के. एस. रवींद्रनाथ होते. या समितीने सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्यात अनेक प्रकारच्या शिफारशींचा समावेश आहे. तर समितीने हसन जिल्ह्यातील हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंना स्वतंत्र केस स्टडी म्हणून पाहण्याची शिफारस केलीय.
कर्नाटकमध्ये कार्डियाक फोबिया झालाय ?
ह्दय तपासणीसाठी होत असलेल्या गर्दीबाबत अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजय भट म्हणाले, 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींमध्ये छातीत दुखणे, धडधडणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे. पण संपूर्ण हृदय तपासणीनंतर त्यांचे हृदय सामान्य असल्याचे आढळून आलंय. बहुतेकदा दीर्घकालीन ताण-तणाव, अपुरी झोप आणि शारीरिक निष्क्रियता यासारख्या जीवनशैलीतील घटकांमुळे असते होते. सौम्य लक्षणे देखील घाबरण्याचे कारण बनतात. अनेक जण रुग्णालयांमध्ये तपासणी करतायत. त्यामुळे दुसराही जातो. त्यातून लोकांना कार्डियाक फोबिया झालाय. असे म्हणता येईल, असे डॉ. भट सांगतात. आरोग्यबाबात लोकांनी जागृत राहिले पाहिले पण घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केलंय.