Parliament Monsoon Session 2023 : सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. संजय सिंह यांनी वारंवार सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचे राज्यसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून राज्यसभा सभापतींनी ही कारवाई केली.
सभागृहात गोंधळ सुरू असतानाच सभापतींनी राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या खुर्चीजवळ संजय सिंह पोहोचले तेव्हा प्रश्नोत्तराच्या तासात फक्त चार प्रश्न झाले होते. अध्यक्षांनी इशारे देऊनही संजय सिंह आपल्या जागेवर गेले नाहीत आणि मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी करत आणि घोषणाबाजी करत राहिले.
Uniform Civil Code : मोहन भागवतांचं मोठं विधान, 2024 पर्यंत देशात समान नागरी कायदा…
संजय सिंह यांच्या निलंबनावर आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, ‘हे दुर्दैवी आहे. आमची कायदेशीर टीम या प्रकरणाची चौकशी करेल. संजय सिंह यांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांचे नेते राज्यसभेच्या अध्यक्षांची भेट घेत आहेत. राज्यसभेच्या अध्यक्षांनी एक वाजता सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे. खासदार पियुष गोयल म्हणाले होते की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, तरीही कामकाजात अडथळा आणला जात आहे.
सभागृहात गोंधळ का?
मणिपूरमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर विरोधक सातत्याने सभागृहात चर्चा आणि पंतप्रधान मोदींकडून उत्तराची मागणी करत आहेत. सोबतच या मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांची घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू आहे.