Uniform Civil Code : मोहन भागवतांचं मोठं विधान, 2024 पर्यंत देशात समान नागरी कायदा…
Uniform Civil Code : समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. सोलापुरातल्या हिराचंद नेमचं सभागृहात त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समान नागरी कायदा लागू होण्याबाबत मोठं विधान केलंय. भाजपला राज्यसभेत बहुमत नाही, त्यामुळे 2024 पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू करणं शक्य नसल्याचं मोहन भागवतांनी स्पष्ट केलंय.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. विधी आयोगाने समान नागरी कायद्याविषयी मते मागवण्यात आलीयं. त्यामुळे आता हा कायदा लवकरच लागू होणार असल्याचं संकेतच पंतप्रधानांनी दिले होते.
…त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री होणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराने केला दावा
त्यावरुन देशात सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलच घमासान पेटलं होतं. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही यामध्ये उडी घेत समान नागरी कायद्यामध्ये जैन आणि ख्रिश्चन धर्मीयांचं भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं.
थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…
आता नूकतंच पुन्हा एकदा समान नागरी कायदा लागू होण्याबाबत चर्चांना उधाण आलयं. अशातच मोहन भागवतांनी 2024 पर्यंत हा कायदा लागू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ते म्हणाले, देशात लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे या लोकसंख्येवर नियंत्रण कायदा लागू करणं गरजेचं आहे.
एखाद्या समाजाची लोकसंख्या अधिक प्रमाणात वाढल्यास फाळणीचा उठाव होतो. आपला देश पूर्वी एकसंघ होता. त्यानंतर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली. आता देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक असल्याचं भागवत म्हणाले आहेत.