…त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री होणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराने केला दावा

…त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री होणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराने केला दावा

Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी बंडामागील कारणं सांगितली जात होती. त्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही असा देखील आरोप करण्यात आले. मात्र आता शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले. ते पुन्हा अर्थमंत्री देखील झाले. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांच्या अजित पवारांवर केलेल्या आरोपांचं काय होणार अशी चर्चा सुरू आहे. त्यावर आता शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Eknath Shinde MLA Sanjay Shirsat Said Ajit Pawar in problem due to CM post Discussion )

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

काय म्हणाले संजय शिरसाट?

शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले. ते पुन्हा अर्थमंत्री देखील झाले. त्यांनी आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी निधी वाटप केला आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच शिवसेनेवर टीका केली आहे. की अजित पवारांवर आरोप केले त्याचं आता काय झालं? काहींना वाटत आमच्यावर किंवा भाजपवर अन्याय झाला असेल पण तसं नाही त्यांनी समान निधी वाटप केलं असून त्यांना जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांना निधी न मिळाल्यावरून शिरसाट म्हणाले की, सत्तेत असल्याने आम्हाला जास्त निधी मिळणे साहजिक आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेत आम्हाला निधी मिळत नव्हता आम्ही काही म्हटलो नाही.

गुलाबी शिमर साडीत रिया चक्रवर्ती बनली ‘देसी बार्बी’

तसेच यावेळी मुख्यपद आणि एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रश्न विचारला असता. शिरसाट म्हणाले की, तो एक औपचारिक दौरा होता. मात्र विरोधक त्याबद्दल शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार अशा अफवा पसरवत आहेत. पण तस काही नाही. शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा त्यांच्या गटाचे आमदार करत आहेत. मात्र त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री तर होणार नाहीत. पण अडचणीत नक्की येतील असं यावेळी शिरसाट म्हणाले.

दरम्यान आमदारांच्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली. शंभूराज देसाई म्हणाले, ‘अर्थसंकल्पानंतर दोन वेळा पुरवणी मागण्या मांडण्यात येतात. ज्या कामांना निधीची गरज आहे. ते यामध्ये मांडसले जातात. पुरवणी मागण्या जयंत पाटील यांच्या मतदारसंघालाही यावेळी निधी देण्यात आला. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या सरकरमध्ये आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव केला जात नाही. हे स्पष्ट झालं आहे.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube