थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…

थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…

Mansoon Session 2023 : राजकीय उलथापालथनंतर अखेर राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे अधिवेशन सुरु असतानाच अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून आत्तापर्यंत 14 जणांचा बळी गेल्याची घटना घडलीयं. त्यावरुन विधानसभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत जाब विचारला आहे. याचवेळी प्रश्नोत्तरादरम्यान, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी सुधीर मुनगंटीवारांना दम देऊनच खाली बसण्याबाबत सांगितल्याचं दिसून आलं आहे.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज बाळासाहेब थोरातांनी मुंबईतील खारघरमध्ये आयोजित महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे. यावेळी ते म्हणाले, राज्यातील एकही जीव जाण्याचं योग्य नसतं पण इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत 14 जीव बळी गेले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक श्रमिकांचा बळी गेला होता. या घटनेला जबाबदार कोण? घटनेबद्दल सरकारकडे जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला लोकशाहीत राज्यघटनेने दिला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तरात आपलं म्हणणं माडावं, तसेच या घटनांचं राजकारण होऊ नये, असं मत थोरात यांनी मांडलं आहे.

‘महाराष्ट्र भूषण’चा वाद चिघळला! फडणवीसांना घेरत जयंत पाटलांनी केली ‘ही’ मागणी

त्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थोरातांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. उत्तरात बोलताना या घटनेचं राजकारण कोणीही करता कामा नये, असं म्हंटल्यानंतर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याचदरम्यान, थोरात यांनी मला उत्तर हरकत घेण्याबाबतची भूमिका मांडली. त्यावेळी मला हरकत घेण्याचा अधिकार असल्याचं म्हणत थोरातांनी सुधीर मुनगंटीवारांना खाली बसण्यासाठी एक प्रकारे दम दिल्याचं दिसून आलं आहे. ते म्हणाले, “आपण बसून घ्या मंत्री महोदय, तुम्हाला खाली बसावं लागणारच” य़ा शब्दांत त्यांनी मुनगंटीवारांना खाली बसण्याचं सांगितलं आहे.

कृषी कर्जांचे वाटप झालेच नाही, सरकार फक्त जखमेवर मीठ चोळते; पटोलेंची घणाघाती टीका

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीसेवकांना उष्माघाताचा फटका बसला होता. अनेक श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

अतिवृष्टीमुळे रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. अतिवृष्टीमुळे डोंगराचा कडाच कोसळल्याने इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून एनडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य अद्यापही सुरुच आहे. या दोन्ही मुद्द्यांवरुन विरोधकांनी अधिवेशनात सरकारला चांगलंच घेरलंय. आमदार जयंत पाटील यांनीही उष्माघाताच्या घटनेवर प्रश्न उपस्थित करीत ज्या शहाण्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याला कारणीभूत ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube