Download App

parliament session : अविश्वास प्रस्तावात ‘इंडिया’ हारली अन् ‘एनडीए’ जिंकली! मतदानाआधीच सभात्याग

parliament session : संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ने मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावात ‘एनडीए’ जिंकली आहे. विरोधी पक्षाच्या इंडियाच्या नेत्यांनी मतदानाआधीच सभात्याग केल्याने हा अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, मणिपुर हिंसाराच्या घटनेवरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर मतदान घेण्यात आलं. मात्र, मोदींचं भाषण सुरु असतानाच विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ने सभात्याग केला होता.

यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष ‘इंडिया’कडून सत्ताधारी नेत्यांना चांगलच कोंडीत पकडल्याचं दिसून आलं होतं. देशातील विविध मुद्दे विशेषत: मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर विरोधकांनी वेठीस धरल्याचं पाहायला मिळालं. या मु्द्द्यावरुन इंडियाकडून एनडीए सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता.

इंडियाकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते. त्यानंतर मतदान पार पडणार होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीपासून ते तासभर विरोधकांवर सडकून टीका करत होते. यावेळी बोलताना मोदींनी अधिवेशनात मंजूर केलेल्या विधेयकांबद्दलची माहिती दिली. हे सांगताना विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असून विरोधकांच्या फिल्डिंवर सत्ताधारी चौकार, षटकार मारत असल्याचं स्पष्ट केलं.

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण करत व्यावसायिकाला मारहाण

तब्बल एक तासापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मात्र, तासभराच्या भाषणात पंतप्रधान मोदींकडून मणिपूर घटनेवर प्रत्युत्तर मिळत नसल्याने अखेर विरोधकांनी मणिपूर घटनेवरुन घोषणाबाजी करत सभात्याग केला. मोदींचं भाषण सुरु असतानाच विरोधकांनी सभागृहातून पाय काढला.

विरोधकांच्या सभात्यागानंतरही नरेंद्र मोदींच्या टीका-टीपण्या सुरुच होत्या. अखेर मोदींनी मणिपूर घटनेवर भाष्य करीत मणिपूरात शांतीचा सुर्य उगवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची ग्वाहीच संसदेत दिली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अविश्वास प्रस्तावावर भाष्य करीत फेटाळल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, 2018 सालीदेखील मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. तेव्हा प्रस्तावाला जेवढे विरोधक तेवढंही मतदान झालं नव्हतं, असंही मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. त्यानंतर आता पुन्हा तुम्ही 2028 मध्ये ठराव आणा, असं आव्हानच मोदींनी विरोधकांनी दिलं आहे.

Tags

follow us