Download App

Parliament Special Session : सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या भाषणाचं कौतुक; दिवगंत भाजप नेत्यांच्या आठवणींना उजाळा

Parliament Special Session : जुन्या संसद भवनात आज संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली असून संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी आज भाषण केलं. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. मोदींच्या याच भाषणाचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी कौतूक केलं आहे. तसेच भाजपच्या नेत्यांची आठवण काढत सुळे यांनी भाजप नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Thalapathy Vijay Movie Poster: थलापती विजयच्या ‘लिओ’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या दोन लोकांची आठवण भाजप नेत्यांनी काढली नाही त्या नेत्यांचं नाव मी पटलावर घेऊ इच्छिते. या दोन्ही नेत्यांच्या संसदीय कार्याचं माझ्यावर प्रभाव आहे. त्याच्यापासून मी प्रभावित आहे. ते नेते भाजपचे आहेत. मला वाटतं ते मोठे नेते होते आणि असाधारण खासदार होते.

Shiv Thakare: शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला गणपती बाप्पाचे दणक्यात आगमन

त्यांचा आम्ही आदर करतो. हे दोन नेते आहेत सुषमा स्वराज आणि अरुण जेटली. ते नेहमी सहकार आणि संघराज्याबद्दल बोलायचे. आम्ही विरोधी पक्षात होतो. तरीदेखील सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. तुम्ही सत्ताधारी असा किंवा विरोधक चांगल्या कामाचे काैतुक व्हायलाच हवे,असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सोलापूरसाठी प्रणितीच योग्य उमेदवार, हायकमांडकडे शब्द टाकणार : लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदेंची फिल्डिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक नेत्यांचा उल्लेख केला पण दोन जणांचा उल्लेख नाही केला, त्यांच्या संसदीय कामकाजावर मी प्रभावित झाली आहे, भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली. या दोन्ही नेत्यांविषयी मला आदर आहे, दोन्ही नेत्यांकडून नेहमीच संघाची भूमिका घेण्यात आली असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Sunny Leone: सनी लिओनी दिसणार ‘या’ आगामी प्रोजेक्टमध्ये !

अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी झालेल्या भाषणात मोदींनी संसदेचा 75 वर्षांचा इतिहास देशासमोर मांडला. तसेच त्यांनी पंडित नेहरू, कॅश फॉर वोट आणि कलम 370 आदी गोष्टींचा उल्लेख केला आहे. एकूणच लोकसभेत पंतप्रधान मोदींनी संसदेच्या इतिहासातील गोड-गोड आठवणी सांगितल्या आहेत.

दरम्यान, या विशेष अधिवेशनाची सुरूवात जुन्या संसद भवनात झाली असून उद्या 19 सप्टेंबरला जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वच खासदार नवीन संसद भवनात पोहोचणार आहेत. 19 सप्टेंबर रोजी नवीन इमारतीत अधिवेशाची बैठक होणार असून 20 सप्टेंबरपासून तेथे नियमित कामकाज सुरू होणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 75 वर्षांचा संसदीय प्रवास, कामगिरी, अनुभव आणि आठवणींवर राज्यसभेत चर्चा झाली आहे. त्यानंतर आता इतर चार दिवसांत पोस्ट ऑफीस विधेयक आणि मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकं राज्यसभेत मांडली जाणार असल्याची शक्यता आहे.

Tags

follow us