Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; मतदार यादीच्या विरोधक घेरणार?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार असून या अधिवेशनात मतदार याद्यांच्या संदर्भातील प्रश्नावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत.

Parliament winter session

Parliament winter session

Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session ) आजपासून 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालणार असून अधिवेशनाच्या एक दिवस आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांकडून मतदार यादीची विशेष पडताळणी, प्रदुषण, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक विषयांवर चर्चेची मागणी लावून धरली. या बैठकीत संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याचे आवाहन मंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे.

मकरंद देशपांडे, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांना ‘नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ प्रदान

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदेंऐवजी खा. नरेश मस्के यांनी बैठकीला हजेरी लावली. परंतु राष्ट्रवादी पक्षाकडून कोणीही बैठकीला उपस्थित नव्हते. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील प्रचारात व्यस्त असल्याने बैठकीला येऊ शकले नाहीत, असे स्पष्ट झाले.

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ‘या’ दोन ठिकाणी निवडणुका रद्द, 20 डिसेंबरला होणार मतदान

सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रिजिजू म्हणाले, संसदेचे कामकाज ठप्प होऊ नये. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सरकार सर्व पक्षांशी चर्चा करत राहील. एसआयआरवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी मान्य झाली आहे का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अधिवेशनाचा अजेंडा संध्याकाळी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवला जाईल.

निलेशजींचा बळीचा बकरा केला जातोय… भावावर गुन्हा दाखल होताच मंत्री नितेश राणे मैदानात

तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी सरकारने एसआयआरसारख्या मुद्द्यांवर चर्चेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी या बैठकीला केवळ औपचारिकता म्हटले आहे. काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी राष्ट्रीय सुरक्षा, हवेचे प्रदूषण, मतदार यादीची शुद्धता आणि शेतकरी समस्या यावर चर्चेची मागणी केली आहे.

Exit mobile version